तीन तहसीलदारांनी परत पाठविली ४० लाखांची निकृष्ट डाळ

By admin | Published: August 18, 2016 01:12 AM2016-08-18T01:12:28+5:302016-08-18T01:12:28+5:30

शासनाने रास्त भाव धान्य दुकानातून वितरित करण्यासाठी पाठविलेली डाळ निकृष्ट असल्याचे कारण देत बाभूळगाव, कळंब आणि राळेगाव

Three tahsildars sent back 40 lakh poor dal | तीन तहसीलदारांनी परत पाठविली ४० लाखांची निकृष्ट डाळ

तीन तहसीलदारांनी परत पाठविली ४० लाखांची निकृष्ट डाळ

Next

 
यवतमाळ : शासनाने रास्त भाव धान्य दुकानातून वितरित करण्यासाठी पाठविलेली डाळ निकृष्ट असल्याचे कारण देत बाभूळगाव, कळंब आणि राळेगाव या तीन तालुक्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. शासकीय दरानुसार या डाळीची किंमत ४० लाख रूपयांच्या घरात आहे.
रास्त भाव धान्य दुकानातून जिल्ह्यासाठी दोन हजार ६५९ क्विंटल तुरडाळ वितरीत करण्याचे नियतन मंजूर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, नेर, कळंब, बाभूळगाव आणि राळेगाव या तालुक्याला तूर डाळीचा पुरवठा करण्यात आला. यातील तीन तालुक्याने डाळ स्विकारण्यास नकार दिला. यवतमाळ आणि नेर तालुक्याने ही डाळ स्वीकारली आहे. या तालुक्याने चांगली डाळ असल्याचा अहवाल दिला आहे. प्रत्यक्षात दुकानात डाळ पोहचल्यानंतर ग्राहक डाळीची खरेदी करतात किंवा नाही यावरून डाळीची गुणवत्ता स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे. (शहर वार्ताहर)
 

Web Title: Three tahsildars sent back 40 lakh poor dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.