तीन हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:27 PM2018-05-21T22:27:22+5:302018-05-21T22:27:22+5:30

तालुक्यातील शेतकरी शासनाच्या धोरणाला कंटाळला आहे. शासकीय दरात शेतकऱ्यांकडून तूर घेऊ, लवकर चुकारे देऊ, कर्ज वाटप करू या घोषणा पोकळ निघाल्या आहे.

Three thousand farmers waiting for sale of Tur | तीन हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत

तीन हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देप्रश्न सुटण्याची आशा : आसूड यात्रेचे आज नेर शहरात आगमन

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील शेतकरी शासनाच्या धोरणाला कंटाळला आहे. शासकीय दरात शेतकऱ्यांकडून तूर घेऊ, लवकर चुकारे देऊ, कर्ज वाटप करू या घोषणा पोकळ निघाल्या आहे. मंगळवार, २२ मे रोजी आमदार बच्चू कडू यांची ‘आसूड’ यात्रा नेर शहरात पोहोचत आहे. ‘आसूड’ या समस्येवर प्रहार करेल का, शेतकºयांना न्याय मिळेल का, असे विविध विचार व मंथन नागरिकात होत आहे.
तालूक्यातील तीन हजार शेतकरी अजूनही तूर विकण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. ४०० शेतकरी तूर विक्रीच्या रांगेत आहे. मान्सून यायला काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शेताची मशागत करून बी-बियाणे आणण्यासाठी शेतकºयांना पैशाची गरज आहे. बँकांनी अजूनही कर्जवाटपाला सुरुवात केली नाही. ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे कर्ज आहे, त्यांना कर्ज निलचे मॅसेज येत आहे. पण जे पीक विकून, उसनवार काढून कर्ज भरत होते, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. व्यापारी शेतकºयांकडून कवडीमोल भावात तूर विकत घेऊन नाफेडमध्ये विविध सातबारावर टाकून शासकीय दराचा फायदा घेत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाफेडने अतिक्रमण केले आहे. तूर घ्यायला नाफेड मुदतवाढीची वाट पाहात आहे. यामुळे बाजार समितीत विखुरलेले तुरीचे ढिग दिसत आहे. नेर तालूक्यातील कर्जबाजारी आणि समस्याग्रस्त शेतकरी ‘आसूड’ आंदोलनापासून खूप अपेक्षा ठेऊन आहे. आमदार बच्चू कडू हे नेर येथे दाखल होणार आहे. केवळ संबोधन नाही तर ‘आसूड’चा प्रहार त्यांनी करावा, अशी तालुक्यातील शेतकºयांना अपेक्षा आहे.

Web Title: Three thousand farmers waiting for sale of Tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.