थकीत करासाठी तीन टॉवर सील
By admin | Published: March 31, 2017 02:25 AM2017-03-31T02:25:47+5:302017-03-31T02:25:47+5:30
नगरपरिषदेने कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली.
नगपरिषदेची कारवाई : मालमत्ता कर वसुली मोहीम
यवतमाळ : नगरपरिषदेने कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली. गुरूवारी शहरातील तीन मोबाईल टॉवरसह एका दुकानाला सील ठोकून मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली.
पालिकेला तब्बल २० कोटींचा कर वसूल करायचा आहे. मार्चनंतर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वारंवार नोटीस बजावूनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरूद्ध कारवाई केली जात आहे. कर अधीक्षक डी. एम. मेश्राम यांच्या नेतृत्वातील पथकाने सिव्हील लाईन परिसरातील रिलायन्सचे मोबाईल टॉवर, जाजू चौकातील जी.टी.एल टॉवर, रूईकर वाडीतील खांदवे कॉम्पलेक्समधील दुकान सील केले. वारंवार सूचना देवून व नोटीस बजावूनही संबंधितांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने धडक मोहीम राबविली जात आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी शेवटच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)