दिग्रसमध्ये गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 10:27 PM2019-07-05T22:27:42+5:302019-07-05T22:28:18+5:30
येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी मल्लीकार्जुन महादेव संस्थान सभागृहात कार्यक्रम झाला. ना.संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष सदफजहा मोहम्मद जावेद, पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवचरित्र व्याख्याता प्रा.नितीन बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व पालकांची ना.राठोड यांनी विचारपूस करून खूप शिका मोठे व्हा, अशी कौतुकाची थाप दिली.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, आरोग्य सभापती केतन रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, नगरसेविका वैशाली दुधे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, दिनेश महिंद्रे, जाधव, गावंडे, अजय भोयर, रमाकांत काळे, मिलिंद मानकर, विनायक दुधे, अतुल राठोड, हनुमान रामावत, अक्षय जयस्वाल, युवा सेना शहर प्रमुख आनंद जाधव, दिनेश खाडे, ओम वºहाडे, महेश कदम, यश अवझाडे, स्वप्निल बदुकले, ललित राठोड, शुभम राठोड, महिला आघाडीच्या संजीवनी शेरे आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक अभय इंगळे, संचालन सुरेंद्रा मिश्रा व सुरेश चिरडे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा - नितीन बानगुडे
शिव व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रथम आयुष्याचे ध्येय निश्चित करा, असे सांगितले. ध्येय निश्चित केले की यश हमखास मिळते. मग परिस्थिती गरीब असो की श्रीमंत. यशाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. गुणांवरून परीक्षेतील यशापयश ठरत असले, तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय, आत्मविश्वास आणि जगण्याचा दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. नापास झालेल्यांनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.