नेताजीनगरात टॉवरवर तरुणाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:59 AM2017-09-25T00:59:41+5:302017-09-25T01:00:28+5:30

एका मनोरुग्ण तरुणाने उंच टॉवरवर चढून पोलिसांसह नागरिकांची झोप उडवून दिली होती. महत् प्रयासानंतर त्याला खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले.

 Thunder of the youth on the tower | नेताजीनगरात टॉवरवर तरुणाचा थरार

नेताजीनगरात टॉवरवर तरुणाचा थरार

Next
ठळक मुद्दे पोलिसांची धावपळ : महत्प्रयासाने उतरविले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एका मनोरुग्ण तरुणाने उंच टॉवरवर चढून पोलिसांसह नागरिकांची झोप उडवून दिली होती. महत् प्रयासानंतर त्याला खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले. ही थरारक घटना येथील दारव्हा मार्गावरील नेताजीनगर जवळील बीएसएनएलच्या टॉवरवर रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
प्रदीप सहदेवराव वानखडे रा. नेताजीनगर असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव आहे. नेताजीनगर जवळ असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरजवळ प्रदीप रविवारी दुपारी पोहोचला. त्या ठिकाणी कुणीही नव्हते. त्यामुळे तो थेट टॉवरवर चढला. २०० फूट उंचावर अगदी शेंड्यावर जाऊन बसला. कोणतीही मागणी नाही की आरडाओरडा नाही. काही वेळातच हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली. तब्बल अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले. त्याच्यावर काही दिवसापूर्वी नागपूर येथील मनोरुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृत्तीत सुधारणा झाल्याने त्याला यवतमाळात आणले होते. परंतु आज तो अचानक टॉवरवर चढला. या प्रकरणाने त्याच्या परिवारात चिंतेचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी त्याला खाली उतरविताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Web Title:  Thunder of the youth on the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.