यवतमाळ जिल्ह्यात वाघाचा तीन युवकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 10:31 AM2021-03-15T10:31:11+5:302021-03-15T10:31:31+5:30
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यात अती दुर्गम झरी तालुक्यातील वाढोणा बंदी येथे वाघाने तीन युवकांवर हल्ला केल्याने हे युवक जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात अती दुर्गम झरी तालुक्यातील वाढोणा बंदी येथे वाघाने तीन युवकांवर हल्ला केल्याने हे युवक जखमी झाले आहेत. हे युवक शेतात काम करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. पैंकू मडावी, अजय आत्राम आणि प्रकाश आत्राम अशी या जखमी युवकांची नावे आहेत. या युवकांना पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. सर्वांची प्रकुती स्थिर आहे. झरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. याच परिसरातील चिंचघाट येतील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर हल्ला केला आहे. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत आहेत. नागरिकांनी या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.