वाघ आला रे आला.. पण वनविभाग उशिरा आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:24+5:30

टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्या शिवारात लोकांना वाघ दिसला. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. परंतु, कर्मचारी पोहोचले नाही. रात्री हा वाघ गावात शिरला.

The tiger came .. but the forest department came late | वाघ आला रे आला.. पण वनविभाग उशिरा आला

वाघ आला रे आला.. पण वनविभाग उशिरा आला

Next
ठळक मुद्देअंधारवाडीत वाघाचा मुक्तसंचार : ‘जनवन’चे २२ लाख खर्चच होईना, टिपेश्वरलगतच्या गावांची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जंगलालगतच्या गावात गेल्या दीड महिन्यांपासून वाघ वारंवार शिरकाव करीत आहे. शनिवारीही तेथे वाघाने चक्क गावभर ‘गस्त’ घातली. पण गावकऱ्यांनी फोन केल्यावरही वनविभागाचे पथक मात्र वेळेवर पोहोचले नाही. विशेष म्हणजे, वाघापासून संरक्षणासाठी येथे २२ लाखांचा निधी मिळूनही वनविभाग खर्चच करीत नसल्याची ओरड आहे.
पांढरकवडा तालुक्यातील कोपामांडवी, अंधारवाडी, कोब्बई, सुन्ना, सावंगी ही गावे टिपेश्वर अभयारण्यालगत आहेत. टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्या शिवारात लोकांना वाघ दिसला. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. परंतु, कर्मचारी पोहोचले नाही. रात्री हा वाघ गावात शिरला. जवळपास तीन तास तो गावातच होता. गावकऱ्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. मात्र वनविभागाचे कर्मचारी रात्री १०.३० वाजता पोहोचले, तोपर्यंत वाघ दाट जंगलाकडे गडप झाला होता.
- वरातीमागून घोडे
अभयारण्यालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील गावांसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतून दरवर्षी २५ लाखांचा निधी येतो. मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्याची तो वापरणे आवश्यक आहे. अंधारवाडी, कोपामांडवी या गावांसाठीही निधी आलेला आहे. मात्र तो खर्च होत नसल्याचा गावकºयांचा आरोप आहे. वाघाच्या धुमाकूळाबाबत वन्यजीव विभागाकडे तक्रार केली की ते प्रादेशिक वनविभागाकडे बोट दाखवितात. मात्र डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा निधी वन्यजीव विभागाकडे असल्याने प्रादेशिक वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, असे गावकºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी वाघ दिसल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाºयांनी रविवारी गावात बैठक घेऊन गावकºयांना केवळ शाब्दिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी तातडीने धावून येतात. मात्र वन्यजीव विभागाचे कर्मचारी येत नसल्याची गावकºयांची ओरड आहे.

रात्री हा वाघ बापूराव पेंदोर यांच्या थेट घरापर्यंत आला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. जनवन विकास योजनेचे २२ ते २५ लाख रुपये वनविभागाकडे दरवर्षी येतात. मात्र आमच्या गावात ते खर्चच केले जात नाही. वाघ व इतर वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी हा पैसे खर्च होणे आवश्यक आहे.
- हनमंतू कायपेल्लीवार,
सरपंच, कोपामांडवी-अंधारवाडी

१ तारखेला माझ्या शेतात वाघ दिसला. पगमार्क दाखवूनही वनविभागाने कार्यवाही केली नाही. पुन्हा ३ दिवस तो वाघ माझ्या शेतात राहिल्याने पिकाचेही नुकसान झाले. तेव्हा गावाला सौरकुंपण, रस्ता अशा सोयी देण्याचे आश्वासन वन विभागाकडून देण्यात आले. मात्र अद्याप कोणतीच सोय झाली नाही.
- व्यंकटेश दडांजे, उपसरपंच, कोपामांडवी-अंधारवाडी

Web Title: The tiger came .. but the forest department came late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.