‘वायपीएस’मध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा

By admin | Published: September 18, 2016 01:32 AM2016-09-18T01:32:00+5:302016-09-18T01:32:00+5:30

येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा पार पडली. यावेळी तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Tobacco Free Service Workshop in 'Yps' | ‘वायपीएस’मध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा

‘वायपीएस’मध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा

Next

यवतमाळ : येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा पार पडली. यावेळी तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी स्लोगन रायटिंग, लघुनाटिका आदी उपक्रम राबविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अतुल इंदूरकर व प्रा. अश्विनी इंदूरकर उपस्थित होत्या. डॉ. इंदूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तोंडाचा कॅन्सर तसेच तंबाखूमुळे होणाऱ्या अन्य दुष्परिणामांची माहिती पॉवर पॉर्इंट स्लाईड शोद्वारे दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधान करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांपासून दूर राहण्याची खात्री दिली. पाहुण्यांचे स्वागत अमोल चन्नूरवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, कार्यकारी प्राचार्य अर्चना कढव, पर्यवेक्षक रूक्साना बॉम्बेवाला यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Tobacco Free Service Workshop in 'Yps'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.