जिल्हा निर्मितीसाठी आज पुसद बंद राहणार
By admin | Published: July 26, 2016 12:11 AM2016-07-26T00:11:22+5:302016-07-26T00:11:22+5:30
पुसद जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मंगळवार २६ जुलै रोजी पुसद बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वपक्षीय आयोजन : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग
पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मंगळवार २६ जुलै रोजी पुसद बंदचे आवाहन करण्यात आले आहे. येथील विश्रामगृहावर सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. जिल्हा निर्मितीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली. जिल्हा निर्मिती हा प्रश्न एका पक्षाचा नसून सर्व जनतेच्या अस्मितेचा झाला आहे. त्यामुळेच आता आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मंगळवारी पुसद बंदचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विश्रामगृहावर भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या आयोजनामागची पार्श्वभूमी अॅड.सचिन नाईक यांनी सांगितली. त्यानंतर युवक मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते, पंचायत समितीचे माजी उपसभापती अवधूत मस्के, पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल, डॉ.असोसिएशनचे डॉ.उमेश रेवणवार, बिरसा मुंडा ब्रिगेडचे मारुती भस्मे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड.आशीष देशमुख, काँग्रेसचे इस्तियाकभाई, नारायणराव क्षीरसागर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास जामकर, विश्वजीत सरनाईक, माजी सरपंच मिलिंद उदेपूरकर, सरपंच नाना बेले, नगरसेवक अशोक उंटवाल, महेश खडसे, नितीन पवार आदींनी विचार व्यक्त केले.
२६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुभाष चौकात सर्वजण एकत्र येणार आहे. त्यानंतर शांततेत लाँग मार्च उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाणार आहे. पुसद जिल्हा निर्मितीबाबत एसडीओंना निवेदन देणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्लेवार यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला सुरज डुबेवार, ज्ञानेश्वर तडसे, अॅड.उमाकांत पापीनवार, गजानन राठोड, योगेश उनके, प्रशांत त्र्यंकटवार, संदीप लांडे, अश्विन चिरडे, सैयइ इस्तियाक, वैभव ठाकूर, अॅड.चंद्रशेखर शिंदे, धनंजय सोनी, अभय गडम, साकीब शाहा, दीपक महाडीक, संतोष दरणे, नाना बेले, अमजद खान, रतीराव राऊत, अविनाश पोळकर, देवा जगताप, अण्णा दोडके, अनिल इंगोले, माधव इंगोले, संभाजी टेटर, संतोष पानपट्टे, अमोल व्हडगिरे, राहुल झिंझारे, शफीक हिराणी, किरण वानरे, संदीप वाढवे, अतुल नागरे, दीपक उकळकर, महेश आर्य, राहुल देशमुख, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)