उद्या प्रचार तोफा थंडावणार

By admin | Published: February 14, 2017 01:41 AM2017-02-14T01:41:54+5:302017-02-14T01:41:54+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अखेरच्या चरणात आला आहे.

Tomorrow's protest will stop the gun | उद्या प्रचार तोफा थंडावणार

उद्या प्रचार तोफा थंडावणार

Next

चुरस वाढली : विजयाची आस साऱ्यांनाच
वणी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अखेरच्या चरणात आला आहे. वणी तालुक्यातील चार गट आणि आठ गणांसाठी होणाऱ्या या निवडणुकाच्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी रात्री १२ वाजतानंतर थंडावणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास उरले असल्याने गट आणि गणातील उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढविला आहे. आपणच विजयी होऊ, असा दावा प्रत्येकच उमेदवार राजकीय गणित मांडून करीत आहेत.
भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे स्वत: या निवडणुकीच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. या नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी या निवडणुकीला अतिशय महत्व दिल्याचे दिसून येत असून हे नेते आपल्या प्रत्येक उमेदवारांसोबत प्रचारासाठी फिरत असल्याचे वणी विधानसभा मतदार संघात पहायला मिळत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत वणी विधानसभा मतदार संघात भाजपाच्या तिकीटावर संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार म्हणून निवडून आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवार निवडून आणण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी नोटाबंदीची झळ सोसणारा ग्रामीण मतदार ऐनवेळी कोणती भूमिका घेतो, यावर भाजपाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
वणी शहर वगळता वणी विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपाच्या ताब्यात याव्यात, यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी शिवसेना व कॉंग्रेसचे प्राबल्य हटविण्यात भाजपाला या निवडणुकीत यश येईल का, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे. एकूणच सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीत रविवारी आढावा बैैठक घेतली. निवडणुकीच्या तयारी पूर्णतेचा आढावा घेऊन पोलीस पाटील व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पोलीस पाटलांवर गाव पातळीवरील प्रत्येक माहिती देण्याची जबाबदारी सोपवून कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिनिधी असल्याची जाणिव करून देऊन ही जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास संबंधिताना टर्मिनेट होऊ शकता, असा इशारा दिला. बैैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शिरपूर, मुकुटबन, पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार, गटविकास अधिकारी खेरे, मुख्याधिकारी दीपक इंगोले, अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील व केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Tomorrow's protest will stop the gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.