पर्यटनाचा मानबिंदू सहस्त्रकुंड उपेक्षितच

By admin | Published: July 22, 2016 02:24 AM2016-07-22T02:24:25+5:302016-07-22T02:24:25+5:30

यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला व विदर्भाचा नायगारा समजल्या जाणारा सहस्त्रकुंड धबधब्याचा परिसर ...

Tourism is notoriously unsustainable | पर्यटनाचा मानबिंदू सहस्त्रकुंड उपेक्षितच

पर्यटनाचा मानबिंदू सहस्त्रकुंड उपेक्षितच

Next

समस्या कायम : पर्यटन विभागाचे दुर्लक्षित धोरण, सुविधांची बोंबाबोंब
उमरखेड : यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला व विदर्भाचा नायगारा समजल्या जाणारा सहस्त्रकुंड धबधब्याचा परिसर मात्र पर्यटन विकासाअभावी गेल्या ५० वर्षापासून उपेक्षितच राहिला आहे.
सहस्त्रकुंड धबधबा जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. धबधब्याचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकृष्ट करतात. धबधब्याचे सौंदर्य डोळ््यात साठवून घेण्यासाठी पावसाळ््यात या ठिकाणी प्रचंड गार्दी असते. मराठवाड्यातील अनेक पर्यटकसुद्धा या ठिकाणी पर्यटणासाठी येत असतात. सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ शासनाच्या उदासिनतेमुळे उपेक्षितच आहे. याठिकाणी कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शसनातर्फे विशेष बसगाड्यांची तथा मुक्कामी राहण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी पर्यटकांना पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा मिळत नाही. विजेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. सहस्त्रकुंडकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्गदर्शक फलकसुद्घा लावण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविण्यात आलेले नाही. अशाही स्थितीत शेकडो पर्यटक या ठिकाणी रोज गर्दी करून असतात.
जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला हा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होऊ शकतो. यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न होत आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या भागातील पंजाबराव माने, विठ्ठलराव देवसरकर, पांडुरंग राणे, केश्वराव देवसरकर आदींनी दिल्लीत जाऊन निवेदन ही दिले होते. परंतु हा प्रश्न अद्यापही रेंगाळतच आहे. पर्यटक मात्र येथे आल्यानंतर त्रस्त दिसतात.
पैनगंगा अभयारण्यातील नयनरम्य देखावे, शेकडो वर्षापासून नांदत असलेली वैविध्यापूर्ण संस्कृती, घरांची सुबक रचना, नागरिकांचा पेहराव लोककला आदीमुळे या परिसराचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र या बाबीकडे पर्यटन विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अभयारण्य प्रशासनाकडून पर्यटकांसाठी विविध योजना राबविणे गरजेचे असतात. त्या योजना मात्र कागदावरच आहे. या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पर्यटनाच्या अनुषंगाने व्यवसायाभिमुख पाऊले उचलली तर स्थानिक बेरोजगारांच्या हाताला कामसुद्धा मिळू शकते. मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्याचा मानबिंदू असलेले सहस्त्रकुंड मात्र उपक्षेचा धनी ठरले आहे.
यासोबतच या परिसरात पैनगंगा अभयारण्य आहे. अभयारण्यात जंगल सफारी सुरू करण्याची आवश्यकता आहे. यासाठी वन्यजीव विभागाने टिपेश्वर अभयारण्यासारखी व्यवस्था पैनगंगा अभयारण्यात करण्याची गरज आहे. सहस्त्रकुंड सोबतच दुधारी धबधब्याचे वैभवही देखणे आहे. मात्र या धबधब्यापर्यंत पोहोचण्यास पर्यटकांना मोठा अडथळा पार करावा लागतो. तेथे सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास गर्दी वाढेल
सहस्त्रकुंडामुळे विदर्भ व मराठवाड्यातील अनेक पर्यटक पावसाळ््यात येथील गर्दी करतात. या ठिकाणी पर्यटकांना पाहिजे तशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या नियोजन विकास निधीतून दिला गेला तर त्याचा फायदा होईल व पर्यटनस्थळावर खर्च केला तर जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित होतील. आणि या परिसराचा विकास होईल हे तेवढेच खरे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सहस्त्रकुंडला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी व त्यावर लाखो रुपयांचा निधी खेचून आणण्यासाठी मात्र या विभागाचे लोकप्रतिनिधी कमी पडत आहे. दिल्लीमध्ये चांगले वजन असलेले काँग्रेसचे नेते अ‍ॅड़ राजीव सातव हे या विभागाचे खासदार आहेत. त्याचप्रमाणे उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने हे महाराष्ट्र शासनाच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदार व आमदार या दोघांनी ममनावर घेतले तर सहस्त्रकुंड व पैनगंगा अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास वेळ लागणार नाही.

 

Web Title: Tourism is notoriously unsustainable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.