वृद्धेने केले विषारी औषध प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:53+5:302021-08-25T04:46:53+5:30
कळमना-शिंदोला रस्त्यासाठी आंदोलन वणी : तालुक्यातील कळमना ते शिंदोला या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ...
कळमना-शिंदोला रस्त्यासाठी आंदोलन
वणी : तालुक्यातील कळमना ते शिंदोला या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २५ ऑगस्टला परमडोह, चनाखा, पाथरी व कळमना येथील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिले. मात्र तरीही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर त्रस्त झालेले गावकरी आता रास्ता राेको आंदोलन करणार आहेत.
मंदिर उघडण्याची भाविकांची मागणी
मारेगाव : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील धार्मिक स्थळाचे दरवाजे बंद अवस्थेत आहेत. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने अनेक गोष्टींवरील निर्बंध कमी केले जात आहेत. पुढील धार्मिक सणाची रेलचेल बघता, आता तरी या धार्मिक स्थळांचे दरवाजे खुली करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील भाविकांकडून केली जात आहे.
शिक्षकाच्या वेतनात अनियमितता
मारेगाव : राज्यातील शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला करायचे ठरले असतानाही तालुक्यातील खासगी शाळातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या मार्च महिन्यापासून अनियमित होत आहे. त्यामुळे गृहकर्ज हप्ता व इतर कर्जावर कर्मचाऱ्यांना व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत असून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करावे, अशी मागणी केली जात आहे.