कृषी उपयोगाचे ट्रॅक्टर पांढरकवडाच्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 09:48 PM2019-06-08T21:48:06+5:302019-06-08T21:48:41+5:30

नवीन ट्रॅक्टर खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार, अशी नोंदणी केली जाते़ त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करातून सूट मिळते़. मात्र अनेक व्यावसायिक कृषी वापराच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली आहे.

Tractor of agricultural use on the road to the white road | कृषी उपयोगाचे ट्रॅक्टर पांढरकवडाच्या रस्त्यावर

कृषी उपयोगाचे ट्रॅक्टर पांढरकवडाच्या रस्त्यावर

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । व्यवसायासाठी केला जातो वापर, दंडाची तरतूद, मात्र संबंधित प्रशासनाकडून तपासणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : नवीन ट्रॅक्टर खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार, अशी नोंदणी केली जाते़ त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करातून सूट मिळते़. मात्र अनेक व्यावसायिक कृषी वापराच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे़ पांढरकवडा तालुक्यात असे अनेक ट्रॅक्टर रस्त्यावरून धावत आहेत.
शासन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. यासाठी विविध योजनांचा माध्यमातून शेतकऱ्यांना सवलत दिली जात आहे़ याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे़ मात्र इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या नावावर इतर लोक घेत आहेत़ तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर आहेत, तर काहींनी ट्रॅक्टरची व्यावसायिक कामासाठी उचल केली आहे़
नियमानुसार कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग हा कृषीसाठी करणे गरजचे आहे़ या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतुद आहे़ शिवाय सदर ट्रॅक्टरची नोंदणीसुध्दा रद्द करण्याची तरतुद आहे़
मात्र बºयाच लोकांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी खुलेआम उपयोग होत आहे़ यात कंत्राटदार, बिल्डर आणि रेती माफियांचा सर्वाधिक समावेश आहे़ या प्रकारामुळे शासनाला कर स्वरूपात प्राप्त होणारा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे़ हा प्रकार मागील चार ते पाच वर्षापासून सुरू असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही़ याबाबत चौकशीची मागणी होत आहे.
अनेक योजनांत गैरप्रकार
शासनाकडून अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार केल्या जातात. या योजना कार्यान्वित करण्यामागे शासनाचा उद्देश चांगला असतो. मात्र अनेकजण जुगाडू वृत्तीतून अशा योजनांचा लाभ घेऊन शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासतात. यामुळे गरजवंत लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. ट्रॅक्टर योजनेचेही नेमके तेच झाले आहे. केवळ शेतीचा सातबारा जोडून कृषी उपयोगासाठी ट्रॅक्टर उचलण्यात आले. मात्र अनेकजण या ट्रॅक्टरचा उपयोग रेती तस्करीसह विविध खासगी व्यवसायासाठी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
शासनाने कारवाई करण्याची गरज
रस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे, ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय कळत नाही़ मात्र अशी तपासणी कुणीही करताना दिसत नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत असून कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग करीत आहे़ शिवाय त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांना रान मोकळे असल्याचे चित्र आहे.

Web Title: Tractor of agricultural use on the road to the white road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती