जिल्हा कचेरीवर धडकला भूमिपुत्रांचा ट्रॅक्टर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:39 AM2017-11-17T00:39:50+5:302017-11-17T00:40:01+5:30
शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी येथील जिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला. येळाबारा येथील शंकर देवस्थानपासून काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी येथील जिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला. येळाबारा येथील शंकर देवस्थानपासून काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.
आक्रोश भुमिपूत्रांचा या समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, सरसकट कर्जमाफी द्यावी, कापसाला सात हजार भाव देण्यात यावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ शहरात पहिल्यादांच ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला. एका पाठोपाठ एक असलेल्या ट्रॅक्टर मोर्चाने शहर वासियांचे लक्ष वेधले. आपल्या मागण्याचे निवदेन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.