टीबी हॉस्पिटलच्या जागेत व्यापारी संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 09:32 PM2019-05-21T21:32:32+5:302019-05-21T21:32:46+5:30

शहरातील टीबी हॉस्पिटलची जागा नगरपरिषदेने खरेदी केली आहे. यासाठी पालिकेला ४५ कोटी द्यावे लागणार आहे. यातील पहिला हप्ता कसबसा शासनाला दिला. आता आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत पालिकेने ५४० दुकानांचे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

Trader package in TB hospital space | टीबी हॉस्पिटलच्या जागेत व्यापारी संकुल

टीबी हॉस्पिटलच्या जागेत व्यापारी संकुल

Next
ठळक मुद्दे५४० दुकाने : १३७ कोटी खर्च, ३० वर्षांची लीज

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील टीबी हॉस्पिटलची जागा नगरपरिषदेने खरेदी केली आहे. यासाठी पालिकेला ४५ कोटी द्यावे लागणार आहे. यातील पहिला हप्ता कसबसा शासनाला दिला. आता आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत पालिकेने ५४० दुकानांचे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
नगरपरिषदेची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी टीबी हॉस्पिटलचा प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. यातून पालिकेला फायदा किती होणार, हे ठामपणे कोणीच सांगू शकत नसले तरी आजची अडचण दूर करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यास इमारत बांधकामावर ३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय कंत्राटदाराकडून नगरपरिषद ८३ कोटी रुपये रोख घेणार आहे. या ८३ कोटींतूनच शासनाला जागेपोटी उर्वरित रक्कम द्यायची आहे. त्यानंतर उरलेला पैसा विकासकामासाठी वापरता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. टीबी हॉस्पिटलची जागा घेण्याचा ठराव केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. याचे परिणामही तत्काळ दिसून आले. आता ही चूक सुधारण्यासाठी प्रकल्प त्वरित गतिमान करणे आवश्यक आहे. प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाल्यास थेट निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. नगरपरिषदेला जास्तीत जास्त मोबदला देणाऱ्या कंत्राटदार कंपनीला हे कंत्राट देण्याचा प्रयत्न आहे.
५४० दुकान गाळ््यांची इमारत बांधून पूर्ण केल्यानंतर कंत्राटदाराने ३० वर्षांपर्यंत त्याचे भाडे वसूल करायचे आहे. लीजचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषद येथील दुकान गाळ््याचे भाडे घेणार आहे.

Web Title: Trader package in TB hospital space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.