लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:07+5:30

कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली.

Traffic jam in lockdown | लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

Next
ठळक मुद्देसंचारबंदीचा फज्जा । गर्दी हटविण्यासाठी पोलीस कुमक रस्त्यावर उतरली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असले तरी शनिवारी यवतमाळ शहरात संचारबंदी उठल्याचे चित्र काही तास कायम होते. शहरी भागातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर कुमक उतरविली. यानंतर शहरातील गर्दी नियंत्रणात आली.
कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली. यवतमाळ शहरातील गांधी चौक, टांगा चौक, सरदार चौक, नेहरु चौक, मारवाडी चौक, दत्त चौक, आर्णी नाका या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी सकाळी पहायला मिळाली. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि काही दुकानदार आपली दुकाने नागरिकांसाठी खुले करीत होते. यातून शहरात संचारबंदी हटल्यासारखे चित्र पहायला मिळत होते. मारवाडी चौकात अक्षरश: वाहतूक ठप्प झाली होती. या चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी असते. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे धान्य घेऊन येणारी वाहने आणि ग्रामीण भागात जाणाºया वाहनांची गर्दी या ठिकाणी पहायला मिळते. यासोबतच नागरिकांनीही या भागामध्ये आता गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस विभागाने सकाळपासून कंबर कसली. रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली. याचे संयुक्तीक उत्तर न मिळाल्याने वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात आले. टोर्इंग वाहनाच्या मदतीने ही वाहने वाहतूक शाखेने आपल्या मुख्यालयात जमा केली. त्यावर दंड आकारला. इतकेच नव्हे तर सायंकाळपर्यंत ही वाहने न देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. यामुळे विनाकारण वाहनांची गर्दी करणाºया नागरिकांना चांगलाच चोप बसला. दुपारनंतर ही गर्दी ओसरली. दिवसभर वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नागरिक विविध कारणे पुढे करीत शहरात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने शनिवारी नागरिकांना घरीच थांबावे लागले. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा करताच सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसून आली.

टांगा चौकावर कुणाचेच लक्ष कसे नाही ?
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टांगा चौकामध्ये आहे. गोळ्या, बिस्कीटांपासून ते गहू, तांदूळ, दाळ, साखर ठोक विक्रीची दुकाने याच परिसरात आहे. या ठिकाणावरुन अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने दररोज ये-जा करतात. किती वाहनांना टांगा चौकात दर दिवसाला प्रवेश द्यावा, याचे कुठलेही नियोजन प्रशासनाकडे नाही. हा रस्ता अरुंद आहे. यासोबतच मोठे ट्रक सारखे ये-जा करतात. छोट्या वाहनांना जाण्यासाठी जागाच राहत नाही. अशा स्थितीत खेड्यांमधून धान्य खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक नसते. मुळात या सर्व गोष्टींचे नियोजन झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडता येणार आहे. मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सर्व वाहने एकाच वेळी, एकाच दिवसी, एकाच ठिकाणी दिसतात. यातून संचारबंदीचा बट्ट्याबोळ होत आहे.

Web Title: Traffic jam in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.