यवतमाळच्या कळंब बायपासवर ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:16 PM2018-04-03T12:16:07+5:302018-04-03T12:27:00+5:30
भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळच्या कळंब बायपासवर सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीने ट्रकचा पाठलाग करताना अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळच्या कळंब बायपासवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीने ट्रकचा पाठलाग करताना अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
सय्यद करीमोद्दीन (५०) असे ट्रॅफिक पोलिसाचे नाव आहे. तो यवतमाळच्या जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत होता. सोमवारी सकाळी कळंब बायपासवर कर्तव्य बजावत होता. त्यावेळी एक ट्रक हात दाखवूनही तपासणीसाठी थांबला नाही. त्यामुळे सय्यद करीमोद्दीनने आपल्या दुचाकीने त्याचा पाठलाग केला. दुचाकी ट्रकच्या पुढे काढण्याच्या प्रयत्नात ते ट्रकच्या चाकाखाली आले. डोक्यावरूनच ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.