पांढुर्ण्यात शाळेची झाली रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:03 PM2018-12-02T22:03:51+5:302018-12-02T22:05:05+5:30

झुक-झुक अगीनगाडीत बसण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या ग्रामीण व आदिवासी भागातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क रेल्वेगाडीतच बसून ज्ञानाचे धडे गिरविण्याचा आनंद घेत आहे. उपक्रमशील शिक्षकाच्या कल्पनेतून साकारलेला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग तालुक्यातील पांढुर्णा बु. येथील शाळेने साकारला आहे.

Train made in school in Whitehall | पांढुर्ण्यात शाळेची झाली रेल्वेगाडी

पांढुर्ण्यात शाळेची झाली रेल्वेगाडी

Next
ठळक मुद्देधुराच्या रेषा : उपक्रमशील शिक्षकांची कमाल, वास्तव शिक्षण

विठ्ठल कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : झुक-झुक अगीनगाडीत बसण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या ग्रामीण व आदिवासी भागातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क रेल्वेगाडीतच बसून ज्ञानाचे धडे गिरविण्याचा आनंद घेत आहे. उपक्रमशील शिक्षकाच्या कल्पनेतून साकारलेला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग तालुक्यातील पांढुर्णा बु. येथील शाळेने साकारला आहे.
तालुक्यातील पांढुर्णा बु. जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत चार शिक्षक अन् ७० विद्यार्थी आहेत. सध्या या शाळेने कात टाकली आहे. शाळेला रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आले. शाळा इमारतीचे बांधकाम ‘एल’ आकाराचे आहे. निरनिराळ्या कल्पनेला प्रत्यक्षात साकारण्याचा आटापिटा करणारे मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांना आगगाडीची कल्पना सुचली. त्यानी संपूर्ण इमारतीलाच रंगरंगोटी करून रेल्वेगाडीचे इंजिन, त्याचे डब्बे, डब्यावर क्रमांक, प्लॅटफार्म, खिडक्या, दरवाजे, दरवाजाजवळ चढण्या-उतरण्यासाठी हँडल, आगगाडीवर पांढुर्णा बु. एक्स्प्रेस, असे नाव देऊन हुबेहुब रेल्वेगाडीच तयार केली. आता पांढुर्णाची शाळा खरोखर रेल्वेगाडीच भासू लागली.
विद्यार्थी दारावर उभे राहून, खिडकीतून डोकावून पाहातात. आगगाडीत बसण्याचा, त्यात बसून ज्ञानाचे धडे गिरविण्याचा मनसोक्त आनंद घेतात. ही शाळा डीजिटल झाली आहे. प्रत्येक खोली सुसज्ज आहे. शाळेत टी.व्ही. प्रोजेक्टर आहे. ही सुविधा ई वर्ग फंडातून करण्यात आली. जिल्ह्यातील ही पहिलीच रेल्वेगाडी साकारणारी शाळा आहे. शाळेची रंगरंगोटी १० वित्त आयोग फंडातून करण्यात आली. मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांच्या संकल्पनेतून विजय डंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र पुनसे, दत्तात्रय ठाकरे या शिक्षकांच्या सहकार्याने ही शाळा सजलेली आहे.
शिक्षक, विद्यार्थ्यांचे होतेय सर्वत्र कौतुक
पांढुर्णा बु. जिल्हा परिषद शाळेच्या रेल्वेगाडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावकºयांसह प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, गटशिक्षणाधिकारी मनुताई पखाले, विस्तार अधिकारी जयंत वैद्य, साधना चौधरी, केंद्र प्रमुख एस.पी. लाकडे यांनीही कौतुक केले. परिसरातील अनेक शिक्षक, विद्यार्थी या शाळेला भेट देत आहे.

Web Title: Train made in school in Whitehall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा