‘वायपीएस’मध्ये प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:12 PM2017-12-15T22:12:42+5:302017-12-15T22:13:18+5:30
शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलाविषयी माहिती व्हावी यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ‘मूल्यांकन विधी की पुनर्रचना स्वरूप’ (माध्यमिकस्तर) असा या कार्यशाळेचा विषय होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलाविषयी माहिती व्हावी यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ‘मूल्यांकन विधी की पुनर्रचना स्वरूप’ (माध्यमिकस्तर) असा या कार्यशाळेचा विषय होता. विदर्भातील १५ विद्यालयांच्या शिक्षकांनी यात सहभाग नोंदविला. सीबीएसईच्या निर्देशानुसार ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सी. सिवरामकृष्णा यांनी मार्गदर्शन केले. सीबीएसईद्वारा निर्देशित परिक्षेचे स्वरूप, वेळ, प्रश्नांचे स्वरूप, परियोजना, नोटबूकची तपासणी, विद्यार्थ्यांचे अनुशासन आदी बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. मूल्यशिक्षा कार्यशिक्षणाचा मूल्यांकन विधी समजावून सांगितला.
यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य जेकब दास यांनीही विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.