शिरपूर फाट्यावर ट्रॅव्हल्सने विद्यार्थिनीला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:29 PM2017-10-14T23:29:45+5:302017-10-14T23:29:55+5:30

भरधाव ट्रॅव्हल्सने शाळकरी विद्यार्थिनीला चिरडून जागीच ठार केल्याची हृदयद्रावक घटना नागपूर मार्गावरील शिरपूर फाट्यावर शनिवारी सकाळी ७ वाजता घडली.

Travels hit the student at Shirpur Phat | शिरपूर फाट्यावर ट्रॅव्हल्सने विद्यार्थिनीला चिरडले

शिरपूर फाट्यावर ट्रॅव्हल्सने विद्यार्थिनीला चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचा चक्काजाम : गतिरोधकाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : भरधाव ट्रॅव्हल्सने शाळकरी विद्यार्थिनीला चिरडून जागीच ठार केल्याची हृदयद्रावक घटना नागपूर मार्गावरील शिरपूर फाट्यावर शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी गतिरोधकाची मागणी करीत यवतमाळ-नागपूर मार्गावर चक्काजाम केला.
मृणाली गजानन राजूरकर (११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कळंब येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलची पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. ती स्कूल बसने दररोज शाळेत ये-जा करीत होते. शनिवारी सकाळी ७ वाजता शाळेत जाण्यासाठी शिरपूर फाट्यावर आली. स्कूल बसची प्रतीक्षा करीत असताना एका भरधाव ट्रॅव्हल्सने तिला चिरडले. त्यात ती जागीच ठार झाली. हा प्रकार माहीत होताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. मागणी करूनही गतिरोधक तयार न केल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी यवतमाळ-नागपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Travels hit the student at Shirpur Phat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.