साखराजवळ ट्रॅव्हल्स उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 09:32 PM2017-12-27T21:32:20+5:302017-12-27T21:32:50+5:30

वणी येथून पांढरकवडाकडे येणारी भरधाव ट्रॅव्हल्स राष्टीय महामार्गावरील साखरा जवळ उलटली. या अपघातात एका महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.

Travels turned down near sugar | साखराजवळ ट्रॅव्हल्स उलटली

साखराजवळ ट्रॅव्हल्स उलटली

Next
ठळक मुद्देतीन प्रवासी गंभीर : खड्डे चुकविताना झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : वणी येथून पांढरकवडाकडे येणारी भरधाव ट्रॅव्हल्स राष्टीय महामार्गावरील साखरा जवळ उलटली. या अपघातात एका महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.
वणी येथून करंजी-पांढरकवडा मार्गे यवतमाळकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच-२९-एम-८१४२) राष्टीय महामार्ग क्र. ७ ने पांढरकवडाकडे येत होती. साखरा गावाजवळील उड्डान पुलाजवळील मोठे खड्डे चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव ट्रॅव्हल्स रस्त्याच्याकडेला उलटली. या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी तर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये रामचंद्र दिगांबर किनाके (५२), रा. रंगनाथ वणी, संजय रामसिंग जाधव (४०) रा. शिवणी ता. घाटंजी आणि आश्विनी विलास नंदनवार (३१) रा. राजूर कॉलरी ता. वणी यांचा समावेश आहे. जखमींना उमरी येथील ख्रिश्चन दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच करंजी महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण पुंड व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरील नागरिकांच्या सहकार्याने जखमी प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर व उमरीच्या रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमींवर पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली.
राष्टीय महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य
राष्टीय महामार्ग क्र. ७ हा काश्मिर येथून कन्याकुमारीला जातो. या मार्गावर वडकी ते पांढरकवडा दरम्यान मोठमोठ्ठे खड्डे पडले आहे. साखरा-धारणा-करंजी या दरम्यान तर जवळपास दोन ते तीन फुटांचे खड्डे आहे. या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहे. बुधवारीसुद्धा साखरा नजीक खड्डे चुकवितानाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सला अपघात झाला.

Web Title: Travels turned down near sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात