सोनखास शाळेत वृक्षारोपण ‘जेडीआयईटी’चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:45 PM2018-07-23T21:45:15+5:302018-07-23T21:45:30+5:30

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वृक्षारोपण केले. शाळेला असलेल्या कंपाऊंडची रंगरंगोटीही विद्यार्थ्यांनी केली.

Tree plantation at Sakhkhas school 'JDIET' | सोनखास शाळेत वृक्षारोपण ‘जेडीआयईटी’चे

सोनखास शाळेत वृक्षारोपण ‘जेडीआयईटी’चे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वृक्षारोपण केले. शाळेला असलेल्या कंपाऊंडची रंगरंगोटीही विद्यार्थ्यांनी केली.
विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नेर पंचायत समितीचे माजी सभापती हेमंत कोटनाके, सरपंच सावित्री गणेश खाडे, उपसरपंच बरखा कोटनाके, सदस्य रत्ना येलके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता पांडुरंग भोयर, मुख्याध्यापिका लता शंकरपुरे, शिक्षिका छाया केळकर, मीनाक्षी गव्हाळे, प्रकाश वेळूकार, ग्रामसेवक एन.एस. भागवत, पोलीस पाटील दिनेश पारधी, विष्णू सूर, रोजगार सेवक कलेश्वर रिंगणे, देवीदास येलके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
प्रा. अक्षय राठोड, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. माहुरे, प्रा. विद्याशेखर, प्रा. मोनल इंगोले, प्रा. सोनल सावरकर यांची जेडीआयईटीतर्फे उपस्थिती होती. उपक्रमासाठी रासेयोच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Tree plantation at Sakhkhas school 'JDIET'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.