रेती कंत्राटदार व वाहतूकदारांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:00 PM2018-02-28T22:00:03+5:302018-02-28T22:00:03+5:30

शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्यासाठी रेती कंत्राटदार व वाहतुकदार एकत्र आले आहे. यादृष्टीने येथे सभा घेण्यात आली. यामध्ये संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.

The tremors of the sand contractor and the transporters | रेती कंत्राटदार व वाहतूकदारांची वज्रमूठ

रेती कंत्राटदार व वाहतूकदारांची वज्रमूठ

Next
ठळक मुद्देअन्यायाविरोधात लढणार : संघटनेची स्थापना, शासनाला निवेदन देणार

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्यासाठी रेती कंत्राटदार व वाहतुकदार एकत्र आले आहे. यादृष्टीने येथे सभा घेण्यात आली. यामध्ये संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित होणाºया निर्णय आणि धोरणातील जाचक अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने या सभेमध्ये चर्चा करण्यात आली. कंत्राटदारांना अनेक ठिकाणी वाहतुकीदरम्यान रॉयल्टी आणि पास असतानाही चौकशीला तोंड द्यावे लागते. अनेकदा शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. प्रामुख्याने २६ डिसेंबर २०१४ च्या धोरणानुसार रेती खनन करून त्याची वाहतूक मायनिंग अ‍ॅप्सद्वारे ठरलेल्या वेळेतसुद्धा वाहन पकडून वाहतुकदार आणि कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविले आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. रेतीचे खनन आणि वाहतूक सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीतच करण्याची अट चुकीची असल्याने त्याविरूद्ध शासनाला निवेदन देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. याशिवाय अनेक विषयांवर या सभेमध्ये चर्चा करण्यात आली.
अध्यक्ष सचिन महल्ले, सचिव शगीर अन्सारी
यवतमाळ जिल्हा रेती वाळू कंत्राटदार व वाहतूक संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन महल्ले, उपाध्यक्ष कृष्णा ढाले, तर सचिवपदी शगीर अन्सारी यांची नियुक्ती झाली आहे. सदस्यांमध्ये राजू पांडे, सचिन दरणे, प्रवीण महाजन, दीपक ठाकरे, कादरभाई, अमोल नाईक, संजय सपाट, अमोल तंबाखे, विजय राऊत, सिद्धार्थ पोपुलवार, रिहान फारूखी, तारेंद्र बोरडे, अमर दळवे, आशीष सावरकर, मुन्ना सिद्दिकी, श्रीकांत कामाते, अख्तर मिर्झा, अमोल गुल्हाने, मजिदभाई, कायदेविषयक सल्लागार किशोर पारोदे यांचा समावेश आहे.

Web Title: The tremors of the sand contractor and the transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.