आदिवासी शेतकऱ्यांना योजनांचा लाभच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:44 AM2021-08-26T04:44:47+5:302021-08-26T04:44:47+5:30
फोटो यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील तरोडा येथे पंचशील सामुदायिक संस्थेची शेतजमीन आहे. ती १२ आदिवासी शेतकरी मागील ६० ...
फोटो
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील तरोडा येथे पंचशील सामुदायिक संस्थेची शेतजमीन आहे. ती १२ आदिवासी शेतकरी मागील ६० वर्षांपासून वहिती करत आहे. मात्र, शेतकरी सन्मान योजनेचा त्यांना लाभ मिळाला नाही.
गेल्या ६० वर्षांपासून पंचशील संस्थेच्या गटक्रमांक ६७ आणि ५७ मधील जमिनीवर तरोडा येथील १२ आदिवासीबांधव वहिती करीत आहे. या शेतजमिनीचा मालकी हक्क तसेच मिळणारे सर्व शासकीय योजनेचे लाभ आदिवासी शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यांना सर्व लाभ मिळण्याच्या मागण्यांसाठी बुधवारी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या नेतृत्वात तरोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी या जमिनीवर शासकीय अनुदानाच्या रक्कम व कर्ज मिळण्याबाबतचे पत्र घाटंजी तहसीलदारांना दिले होते. मात्र, केवळ हा एकच लाभ शेतकऱ्यांना मिळाला. त्यापूर्वी आणि नंतर एकही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे आदिवासी युवा परिषदेने निवेदन दिले. यावेळी आकाश आत्राम, तरोडाचे सरपंच वसंत कोवे, सुरेश पेंदोर, तुकाराम वेलादे, वसंता घोडाम, मारुती करपते, जंगा मडावी, गंगाराम आडे, दत्ता शेडमाके, वसंत कुवे, तुळशीराम तोडसाम, सावित्री कोवे आदी उपस्थित होते.