आदिवासी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:28 PM2017-12-01T23:28:14+5:302017-12-01T23:28:24+5:30

पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चिचघाट येथील आश्रमशाळेत आयोजित तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप झाला.

The tribal project concludes at the end of the state-level sports event | आदिवासी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप

आदिवासी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप

googlenewsNext
ठळक मुद्देहिवरी केंद्राला विजेते पद : खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चिचघाट येथील आश्रमशाळेत आयोजित तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप झाला.या स्पर्धेत हिवरी केंद्राने सर्वसाधारण विजेते पद पटकाविले असून सर्व विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी भुवनेश्वरी एस. होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक का.म. अभर्णा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर कनाके, लेखाधिकारी डाखोरे, सहायक प्रकल्प अधिकारी लोखंडे, जी.बी.तेलंगे, कार्यालयीन अधीक्षक कोल्हे, मुख्याध्यापक विनोद संगीतराव, डी.एम. खडसे, उत्तम दुधे, सीमा वाघमारे, हरीष डंभारे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे प्रकल्पाध्यक्ष श्रीकृष्ण वाघाये, विस्तार अधिकारी उरकुडे, दीपक कांबळे, रत्नकला मरसकोल्हे उपस्थित होते. या ्रकार्यक्रमात मुख्याध्यापक डी.एम. खडसे यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत हिवरी, चिंचघाट, शिबला, जांब, बोटोणी, बोथ, आंतरगाव या संघांनी विजेत्या आणि उपविजेते पद पटकाविले. तसेच वैयक्तिक खेळाडूंना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविले. यशस्वीतेसाठी उत्तम दुधे, प्रकाश मोरे, श्रीकृष्ण वाघाये, रमेश जिरापुरे, हरीष डंभारे, दीपक कांबळे, प्रणिता भुरके, राजू रोहणकर, सतीश गोळे, विनायक मडावी, विजय क्षीरसागर, गोपाल भटकर, संजय शिरभाते, नितीन चारोळे, सुशील घोटकर, किशोर पारटकर, राजेश उगे आदींनी परिश्रम घेतले. संचालन प्रा. आर.एस. घोसले व रमेश जिरापुरे तर आभार प्रा. महेश मोकडे यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी वन सेवेत यावे - के.अभर्णा
खेळात हार-जीत होणारच. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना यश मिळविता आले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक के.अभर्णा (आयएफएस) यांनी केले. आश्रमशाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वन विभागात नोकरी स्वीकारावी, असे त्या म्हणाल्या.

Web Title: The tribal project concludes at the end of the state-level sports event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.