आदिवासी विद्यार्थिनींची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Published: August 5, 2016 02:39 AM2016-08-05T02:39:00+5:302016-08-05T02:39:00+5:30
शिवाजीनगरमधील वसतिगृहातील उपोषणकर्त्या विद्यार्र्थिनींना वसतिगृहातून कमी का करण्यात येऊ नये,
यवतमाळ : शिवाजीनगरमधील वसतिगृहातील उपोषणकर्त्या विद्यार्र्थिनींना वसतिगृहातून कमी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस प्रकल्प अधिकाऱ्यांनी बजावली आहे. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
येथील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींनी विविध मागण्यांसाठी दोन दिवस उपोषण केले. त्यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार त्यांनी काही मागण्या मान्य केल्या. आता मात्र त्यांनी उपोषणकर्त्या काही विद्यार्थिनींना वसतिगृहातून प्रवेश रद्द करण्याची नोटीस बजावली. त्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात गुरूवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या मागण्या रद्द करू नये, गृहपाल निवासी राहात नसल्यास त्यांची तत्काळ बदली करावी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास गृहपाल व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, भोजन कंत्राटदार बदलावा, शैक्षणिक साहित्याचा पुरवठा्र रावा, अशा मागण्या केल्या आहेत.
या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शिवाजीनगर वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)