पुसद येथे फुटबॉलचे भीष्म पितामह बंडूदादा आहाळे यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:26+5:302021-06-26T04:28:26+5:30
पुसद : येथील युनिक स्पोर्टस् क्लब, बाबला स्पोर्ट्स, मॉर्निंग ग्रुप व यशंवत स्टेडियम ग्रुप यांच्या वतीने फुटबॉलचे भीष्म पितामह ...
पुसद : येथील युनिक स्पोर्टस् क्लब, बाबला स्पोर्ट्स, मॉर्निंग ग्रुप व यशंवत स्टेडियम ग्रुप यांच्या वतीने फुटबॉलचे भीष्म पितामह दिवंगत बंडोपंत (बंडू दादा) आहाळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यशवंत स्टेडियमवर श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. बंडू आहाळे यांनी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत येथे फुटबॉलसाठी सेवा दिली. ते जिल्ह्यात फुटबॉल सामने आयोजनासाठी नेहमी तयार रहायचे. त्यांनी येथे दिवंगत भैयासाहेब राजे व दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नावाने सतत ४७ वर्षे फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले. ते यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघाचे सचिव, महाराष्ट्र फुटबॉल संघटना व स्थानिक चेतना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य फुटबॉलसाठी अर्पण केले होते.
श्रद्धांजली सभेत मॉर्निंग ग्रुपचे सदस्य प्रवीण गायकवाड, सुभाष काळे, भाऊ डाळे, गजानन एडतकर, चंदन जाधव, भाऊ वानखेडे, विदर्भ केसरी मंगेश करण, विशाल घाटे, अमित बोरले, अनिस चौहान, दिलीप वासुदेव आदींनी शोक संवेदना व्यक्त केल्या.