निष्क्रीय आदिवासी आमदारांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:04 AM2019-03-09T00:04:27+5:302019-03-09T00:05:21+5:30
धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली. भाजपाच्या आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. शुक्रवारी स्थानिक तिरंगा चौकामध्ये हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात हे आंदोलन आले. आंदोलकांनी आदिवासी आमदारांचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. धनगर जातीला आदिवासीप्रमाणे शासनाच्या सोयी सुविधा देण्यात येऊ नये. त्यासाठी आदिवासींचा निधी वापरण्यात येऊनये, आदिवासींना वनजमिनी घरे, अतिक्रमणे नियमानुकूल करून त्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी. डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम, राजू चांदेकर, आॅल इंडिया एम्पलॉईज फेडरेशनचे गुलाब कुडमेथे, अनुसूचित जाती जमाती संघटनेचा अखिल भारतीय परिसंघ शाखेचे एम. के. कोडापे, शामादादा कोलाम बिरसा ब्रिगेड संघटना शाखेचे शैलेश गाडेकर, बिरसा ब्रिगेडचे डॉ. अरविंद कुडमेथे, फासेपारधी संघटनेचे बाबाराव राठोड, आनंद देवगडे, विठोबाजी मसराम, पवन आत्राम, गणेश मेश्राम, निळकंठ तोडसाम, खुशाल गेडाम, प्रा. वसंत कनाके उपस्थित होते.