अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:41 PM2019-01-11T21:41:05+5:302019-01-11T21:44:59+5:30

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.

Troubled moments, death does not belong to Delhi, local woman gets sick - Vaishali Yeddy | अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

Next
ठळक मुद्दे पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती.

स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी
यवतमाळ : अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.
मराठीच्या एवढ्या मोठ्या मंगल सोहळ्यात कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी माज्यासारखी विधवा कामी आली हे माझं भाग्य समजते असे म्हणत येडे यांनी आवर्जून नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे उदघाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान कोणाकडे जाणार याबाबत सर्व स्तरांवर चर्चा रंगत होती. काही मान्यवर साहित्यिकांनी पुन्हा सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करण्याची मागणी केली होती. अखेर संयोजकांनी गुरुवारी दुपारी या वादावर पडदा टाकत वैशाली येडे यांचे नाव उद्घाटक म्हणून घोषित केले. त्यांनतर येडे यांच्या मनोगताविषयी साहित्य वतुर्ळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र याला पूर्णविराम देत येडे यांनी अत्यंत परखड आणि बेधडकपणे आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली.
याप्रसंगी येडे यांनी म्हटले की , पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती. शेतकरी मरणानंतर अंबानी, अदानी होत नाही हे माज्या नवऱ्याला समजले नाही याची खंत आहे. माझा मात्र या जन्मावर विश्वास आहे म्हणून याच जन्मात ही वायद्याची शेती फायद्यात करण्यासाठी लढत आहे. मी बहिणाबाईंची लेक आहे, म्हणून कोणी अंगावर हात टाकला तर त्याला हात दाखविण्याची ताकद आहे, असे सांगत मी विधवा नाही, एकल महिला आहे असे येडे यांनी अधोरेखित केले. लेखन, साहित्याचा बाजार वाचत नाही , मी माणसांमध्ये राहून माणस वाचली, पण साहित्यातून जगण्याच बळ मिळत हे खरे आहे. त्यामुळेच 'तेरव' या नाट्यकृतीचा जन्म झाला. यातून एकल महिलांच्या जगण्याचा मदार्नी संघर्ष दाखविला आहे असे येडे म्हणाल्या

जग रहाटीनं लादलेल विधवापण
बाई नवऱ्याच्या घरी जाताना कुळ, दैवत, माय-बाप नवअडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. मात्र असेच एखाद्या पुरुषाच्या बाबतीत झाले तर त्याला जमेल का असा परखड सवाल येडे यांनी उपस्थित केला. माज्या वाट्याला आलेल पांढर कपाळ हे निर्सगाच्या नियमाने आलेल नाही तर जगरहाटीनं आले आहे असे सांगत व्यवस्थेन अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.

लेखक अन कास्तकार सारखेच
तुम्ही आमच्या दु:खावर कादंबऱ्या लिहिता, कथा लिहिता..त्याला पुरस्कार मिळतात. त्यावर सिनेमेही निघतात मात्र त्याला भाव मिळत नाही असे म्हणत लेखक आणि कष्टकरी सारखेच असल्याचे येडे म्हणाल्या. मात्र आता संमेलनाच्या निमित्ताने अभावात जगणाऱ्याला भाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Troubled moments, death does not belong to Delhi, local woman gets sick - Vaishali Yeddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.