अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात, १७ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 05:21 PM2022-01-30T17:21:05+5:302022-01-30T17:37:52+5:30

ताडपत्री झाकून असलेला हा ट्रक राणीअमरावती गावाजवळील वेरुळा नदीवरील पुलावर उभा असलेला आढळून आला. चालक व सोबत असलेला, असे दोघेही पसार झाले होते.

truck carrying cattle seized by police 17 animal rescued | अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात, १७ जनावरांची सुटका

अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात, १७ जनावरांची सुटका

Next
ठळक मुद्देभल्या पहाटे १७ गोवंशाची सुटका

यवतमाळ : राणी अमरावती- आलेगाव रस्त्यावर सतरा बैल कोंबून भरलेला ट्रक पोलिसांनी रविवारी पहाटे ५.३० दरम्यान पाठलाग करून ताब्यात घेतला. या पोलीस ठाण्यांतर्गत दोन आठवड्यांतील ही दुसरी कारवाई आहे.

एमएच ३२ सीक्यू ७२७९ क्रमांकाचा ट्रक बाभूळगाव बसस्थानकावरून सुसाट वेगाने यवतमाळकडे जाताना गस्तीवरील निरीक्षक मंगेश डांगे यांना दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. याची माहिती यवतमाळ नियंत्रण कक्षाला देऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला हा ट्रक राणीअमरावती गावाजवळील वेरुळा नदीवरील पुलावर उभा असलेला आढळून आला. चालक व सोबत असलेला, असे दोघेही पसार झाले होते.

ट्रकमधील पाच बैल मृतावस्थेत आढळले. ट्रकसह १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, निरीक्षक मंगेश डांगे, पोलीस शिपाई रवींद्र इरटकर, संजय कोहाड यांनी पार पाडली. सर्व गोवंश सरूळ येथील गोरक्षणात पाठविण्यात आले. गोरक्षणात चाऱ्याची टंचाई भासत असल्याचे सांगितले जाते.

Web Title: truck carrying cattle seized by police 17 animal rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.