ट्रक फसल्याने पाच लाखांचे सागवान टाकून तस्कर पसार

By admin | Published: July 18, 2014 12:20 AM2014-07-18T00:20:13+5:302014-07-18T00:20:13+5:30

परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सात घनमीटर लाकूड तस्करी करण्याच्या बेतात असताना ट्रक पंक्चर होवून दगडात फसला. त्यामुळे तस्कर ट्रक तेथेच

Truck worth Rs 5 lakh was seized by truck crude smuggler | ट्रक फसल्याने पाच लाखांचे सागवान टाकून तस्कर पसार

ट्रक फसल्याने पाच लाखांचे सागवान टाकून तस्कर पसार

Next

सुधाकर अक्कलवार - घाटंजी
परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सात घनमीटर लाकूड तस्करी करण्याच्या बेतात असताना ट्रक पंक्चर होवून दगडात फसला. त्यामुळे तस्कर ट्रक तेथेच सोडून पसार झाले. ही घटना इंजाळा शिवारात
उघडकीस आली. मात्र कारवाईच्या भीतीने आता वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे.
घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा वन वर्तुळातील इंजाळा येथील वनजमिनीवरील सुमारे ८० सेमीच्यावर गोलाई असलेल्या ३४ सागवान वृक्षांची एका रात्रीतून तस्करांनी कत्तल केली. त्यानंतर सुमारे सात घनमीटर सागवान लाकूड ट्रकद्वारे तस्करी करण्याच्या बेतात असताना त्यांचा ट्रक (क्र. एमएच-२०-एटी-३७४५) पंक्चर होवून दोन मोठ्या दगडांमध्ये फसला. ट्रक बाहेर काढण्यासाठी तस्करांनी सुमारे अडीच घनमीटर सागवान लाकूड बाहेर फेकले तरीही ट्रक चिखलाबाहेर निघाला नाही. त्यामुळे भीतीपोटी तस्करांनी ट्रक आणि सागवान लाकूड सोडून पोबारा केला. ही बाब सकाळी घराबाहेर पडलेल्या एका वनचौकीदाराच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन. मन्साळ यांना दिली.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच साखर झोपेत असलेले वनाधिकारी आणि कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. या वेळी ट्रक आणि जमिनीवर पडून असलेल्या सागवानाचा पंचनामा करून ट्रकसह लाकूडसाठा जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात परिपक्व सागवान वृक्षांची तस्करी झाल्याने कारवाई ओढवेल, अशी भीती वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होती. त्यामुळे ही घटना उघडकीस आणणाऱ्या वन चौकीदाराला समज देत कारवाईचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यामध्ये पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाचे एसीएफ ए.एन. सोनकुसरे, घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन. मन्साळ यांनी रेकॉर्डवर वेगळेच दर्शविले. त्यामध्ये तस्कर लाकूडसाठा घेऊन पसार होत असताना वन पथकाने त्यांचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक आणि सागवान लाकूडसाठा जंगलात सोडून तस्कर पसार झाल्याचे सांगण्यात आले. वर्षभरापूर्वी साखरा वनवर्तुळ आणि इंजाळा येथील वनजमिनीवरून मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली. त्यावेळी तो लाकूडसाठा बेवारस दर्शवून प्रकरणाला वेगळी कलाटणी दिल्या गेली. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचेही त्यामध्ये पितळ पिवळे झाल्याने मोठे प्रकरण दडपल्या गेले. आता इंजाळा येथील वृक्ष कत्तल आणि तस्करी संदर्भात वरिष्ठ वनाधिकारी काय दखल घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Truck worth Rs 5 lakh was seized by truck crude smuggler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.