विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:30 PM2019-01-01T22:30:03+5:302019-01-01T22:31:22+5:30

विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.

The true evolution of human beings is due to science | विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती

विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती

Next
ठळक मुद्देमाधुरी आडे : आर्णी येथे विज्ञान प्रदर्शन व बालनाट्य स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग आणि स्वामी विवेकानंद डिजिटल शाळेच्यावतीने आयोजित ‘आविष्कार-२०१९’ या उपक्रमांतर्गत तालुका विज्ञान प्रदर्शन, बालनाट्य स्पर्धा आणि क्रीडा सामन्याचे उद्घाटन माधुरी आडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याचा प्रभावीपणे उपयोग करून सुसंस्कृत व गुणवान विद्यार्थी घडवावे, असे त्या म्हणाल्या.
पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनीही विचार मांडले. विचारपीठावर आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, विलास अगलधरे, संदीप उपाध्ये, किशोर रावते, हिरामण जाधव आदी उपस्थित होते. संचालन आसाराम चव्हाण यांनी, तर आभार मुख्याध्यापक आकाश जाधव यांनी मानले.

Web Title: The true evolution of human beings is due to science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.