महामार्गावरील वळण ठरतेय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:15+5:302021-09-02T05:31:15+5:30
तंटामुक्त समित्या थंडावल्या पांढरकवडा : शासनाने तंटामुक्त गाव योजना सुरू केली. त्यात तालुक्यातील अनेक गावांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ...
तंटामुक्त समित्या थंडावल्या
पांढरकवडा : शासनाने तंटामुक्त गाव योजना सुरू केली. त्यात तालुक्यातील अनेक गावांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अनेक गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षिसे देऊन त्यांना गौरविण्यात आले; परंतु अलीकडील काळात या समित्या थंडावल्याचे दिसून येत आहे. गावातील तंटे वाढतानासुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे या समित्या आता पुन्हा ॲक्टिव्हेट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महामार्गावरून जनावरांची तस्करी सुरूच
पांढरकवडा : महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी सुरूच आहे. वाहनांमध्ये कोंबून जनावरे हैदराबादच्या दिशेने नेली जात आहे. पोलीस अनेकदा जनावर तस्करी रोखतात, मात्र तरीही दिवसरात्र जनावरांची तस्करी सुरूच आहे. तसेच तालुक्यातील काही ग्रामीण भागातूनही रात्रीच्या वेळी पायदळ जनावरे तेलंगणात नेली जात आहे.
कृषी केंद्रामध्ये वाढली शेतकऱ्यांची गर्दी
पांढरकवडा : येथील अनेक कृषी केंद्रामध्ये कृषी तसेच इतर शेतीविषयक साहित्य घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. ऑटो तसेच इतर वाहनाने ग्रामीण भागातील शेतकरी शहरात दाखल होत आहे. तसेच ग्रामीण भागातील कृषी केंद्रामध्येही गर्दी दिसून येत आहे.
विष प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू
मारेगाव : तालुक्यातील रामपूर (कुंभा) येथील एका १९ वर्षीय युवतीने २७ ऑगस्टला रात्री कीटकनाशक औषध प्राशन केले होते. तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शिवानी महादेव रामपुरे असे मृत युवतीचे नाव आहे. २७ ऑगस्टला रात्री तिने विष प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व तेथून चंद्रपूर येथे हलविण्यात आले, मात्र रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.