बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 05:00 AM2022-06-09T05:00:00+5:302022-06-09T05:00:01+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७ हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १७ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ८३६ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १५ हजार ६४२ पैकी १४ हजार ९८४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात यवतमाळ जिल्हा पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील एकूण ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ३१ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९५.१३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.७७ टक्के इतका होता.
कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७ हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १७ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ८३६ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १५ हजार ६४२ पैकी १४ हजार ९८४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७९ टक्के इतके आहे.
तालुकानिहाय बारावी निकालाची आकडेवारी पाहिली असता जिल्ह्यात सर्वाधिक ९८.०५ टक्के निकाल महागाव तालुक्याचा लागला आहे. तर सर्वात कमी म्हणजे ८६.७१ टक्के निकाल वणी तालुक्याचा लागला आहे. वणी तालुक्याची शैक्षणिक घसरण चिंता वाढविणारी आहे. मागील वर्षी वणी तालुक्याचा बारावीचा निकाल १०० टक्के इतका लागला होता. यवतमाळ तालुक्याचा निकाल ९६.१८ टक्के, नेर तालुका ९६.२४, दारव्हा ९०.८२, दिग्रस ९५.८८, आर्णी ९७.८५, पुसद ९७.०७, उमरखेड ९७.५७, महागाव ९८.०५, बाभूळगाव ९७.१३, कळंब ९४.२७, राळेगाव ९५.२५, मारेगाव ९२.४१, पांढरकवडा ९४.२६, झरी जामणी ९५.२७ तर घाटंजी तालुक्याचा निकाल ९१.९६ टक्के इतका लागला आहे. मुलांच्या तुलनेत यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे.
मागील वर्षी लागला होता ९९.७७ टक्के निकाल
इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल यंदा ९५.१३ टक्के लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.७७ टक्के इतका होता. मागील वर्षीच्या निकालाची तुलना केली असता यंदाच्या निकालात साधारण साडेचार टक्क्यांची घसरण दिसून येते. मागील वर्षी यवतमाळ तालुक्याचा ९९.८२ टक्के होता. बाभूळगाव १००, नेर ९९.६८, दारव्हा ९९.५८, दिग्रस ९९.६१, आर्णी ९९.१३, पुसद ९९.७५, उमरखेड ९९.६९, महागाव ९९.८१, कळंब ९९.८१, राळेगाव ९९.०३, मारेगाव १००, पांढरकवडा १००, झरी १००, वणी १०० तर घाटंजी तालुक्याचा ९६.६२ टक्के इतका निकाल लागला होता.
रिपीटर विद्यार्थ्यांचा ६०.०८ टक्के निकाल
- रिपीटर असलेल्या ७३९ विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली हाेती. त्यातील ३२७ मुले आणि ११७ मुली असे ४४४ जण उत्तीर्ण झाले असून रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ६०.०८ टक्के इतका आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६२.१६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ५४.९२ टक्के इतके आहे.
निकाल समाधानकारक
- यंदाच्या बारावी निकालात साडेचार टक्क्यांची घट दिसत असली तरी मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क असल्याने निकाल फुगलेला होता. यावेळी मात्र ऑफलाईन परीक्षा झाली.