दोन फौजदारांचा हृदयाघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:35 PM2018-08-20T22:35:19+5:302018-08-20T22:35:43+5:30
वणी व लोहारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयाघाताने मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता व त्यातून वाढणाºया कामाच्या ताणातूनच अशा घटना घडत असल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/वणी : वणी व लोहारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयाघाताने मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता व त्यातून वाढणाºया कामाच्या ताणातूनच अशा घटना घडत असल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे.
वणीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक फौजदार म्हणून कार्यरत शैलेंद्र चौधरी (४५) यांचा सोमवारी दुपारी ३ वाजता कार्यालयातून मेघदूत कॉलनीतील घरी गेले असता अवघ्या अर्धा तासातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही कळायच्या आतच हृदयाघाताने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.
कर्तव्यावरच हृदयविकाराचा झटका
/>यवतमाळ येथील लोहारा पोलीस ठाण्यात रविवारी रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले सहायक फौजदार कैलास तुळशीराम सुरपाम (५७) यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाली. सहकाºयाने शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे यवतमाळ पोलीस मुख्यालयात सुरपाम यांना मानवंदना देण्यात आली. सोनखास येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.