दोन भूमिपुत्रांना कबड्डी स्पर्धेत गोल्ड मेडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:48 AM2021-09-23T04:48:30+5:302021-09-23T04:48:30+5:30

महागाव/बिजोरा : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे राजकुमार जाधव आणि अमन आडे या दोन भूमिपुत्रांनी हरियाणातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात ...

Two Bhumiputras won gold medals in Kabaddi competition | दोन भूमिपुत्रांना कबड्डी स्पर्धेत गोल्ड मेडल

दोन भूमिपुत्रांना कबड्डी स्पर्धेत गोल्ड मेडल

Next

महागाव/बिजोरा : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे राजकुमार जाधव आणि अमन आडे या दोन भूमिपुत्रांनी हरियाणातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात ‘रोहतक गोल्ड मेडल्स’ पटकावून जिल्ह्यासह महागाव तालुक्याचे नाव उंचावले आहे.

तालुक्यातील बेलदरी येथील १७ वर्षीय अमन संदीप आडे आणि कासारबेहळ-सेवानगर येथील २२ वर्षीय राजकुमार भिकू जाधव या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातून अमन आडे याने सिल्व्हर मेडल पटकाविले. २२ वर्षे वयोगटातून राजकुमार जाधव याने गोल्ड मेडल प्राप्त केले.

अमन आणि राजकुमार यांनी जिल्ह्यासह तालुक्याचा नावलौकिक केला आहे. राजकुमार हा विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. या दोघांनी महागावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघांचे स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशननेही कौतुक केले.

Web Title: Two Bhumiputras won gold medals in Kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.