नगरसेविकेच्या घरासमोर दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 10:12 PM2020-03-09T22:12:24+5:302020-03-09T22:12:30+5:30
वणी शहरात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे कृत्य राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंदन कोकाजी चव्हाण यांनी याप्रकरणी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील नगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका अक्षता चव्हाण यांच्या अंगणात उभ्या असलेल्या दोन दुचाकी अज्ञात समाजकंटकाने जाळल्याची घटना सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
वणी शहरात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे कृत्य राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंदन कोकाजी चव्हाण यांनी याप्रकरणी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. अक्षता चव्हाण यांचे शास्त्रीनगर परिसरात घर असून रविवारी रात्री टीव्हीएस वेगो व सुझूकी अशा दोन दुचाकी उभ्या होत्या. पहाटे १.३० वाजताच्या सुमारास अचानक अंगणातील या दुचाकींमधून भडका उडाला. काही वेळताच आगीने रौद्ररूप धारण केले. ही बाब लक्षात येताच अक्षता चव्हाण यांचे भाऊ कुंदन चव्हाण हे घराबाहेर आले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
समाजकंटकांनी दुचाकी जाळण्यासाठी पोत्यांचा वापर केला. या दुचाकींवर आधी पोते टाकण्यात आले व नंतर आग लावण्यात आली, असे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर कुंदन चव्हाण यांनी लगेच वणी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली.
एखाद्याच्या अंगणात उभी असलेली वाहने जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. अक्षता चव्हाण ह्या नगरसेविका आहे. त्यामुळे राजकीय द्वेषातून तर समाजकंटकांनी हे कृत्य केले नाही ना, याची शक्यता वणी पोलिसांकडून पडताळली जात आहे.