जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच घटनेच्या दोन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 05:00 AM2022-04-27T05:00:00+5:302022-04-27T05:00:20+5:30

जिल्हा बॅंकेने चिलगव्हाण सोसायटीतील अपहारासंदर्भात पाेलीस तक्रार दिल्याचे समजल्यानंतर चिलगव्हाण सोसायटीच्या सचिवाने   ठाण्यात धाव घेवून बँकेच्या अधिकारी-कर्मचारी व बनावट कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी अशा २१ जणांविरुद्ध सोमवारी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली.  एकाच प्रकरणात दोन तक्रारी आल्याने  सविस्तर माहितीसाठी ठाणेदाराने हे प्रकरण वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अंकेक्षण अहवाल मागितल्याचे समजते. 

Two complaints of the same incident from the District Central Bank | जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच घटनेच्या दोन तक्रारी

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच घटनेच्या दोन तक्रारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव :  चिलगव्हाण सोसायटीतील अपहारप्रकरणी मंगळवारी जिल्हा बॅंक आणि चिलगव्हाण सोसायटीच्या वतीने स्वतंत्र   तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. एकाच प्रकरणात दोन तक्रारी देण्याचा हा प्रकार अनावधानाने झाला की जाणीवपूर्वक अशी चर्चा असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तक्रारीत अहवालातील नावे वगळून केवळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्या विराेधात  बँकेने तक्रार दिली आहे. या प्रकरणात काहीजणांना वाचविण्याचा प्रयत्न होत नाही ना अशी चर्चा आहे. 
जिल्हा बॅंकेने चिलगव्हाण सोसायटीतील अपहारासंदर्भात पाेलीस तक्रार दिल्याचे समजल्यानंतर चिलगव्हाण सोसायटीच्या सचिवाने   ठाण्यात धाव घेवून बँकेच्या अधिकारी-कर्मचारी व बनावट कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी अशा २१ जणांविरुद्ध सोमवारी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली.  एकाच प्रकरणात दोन तक्रारी आल्याने  सविस्तर माहितीसाठी ठाणेदाराने हे प्रकरण वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अंकेक्षण अहवाल मागितल्याचे समजते. 
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालानुसार जवळपास एक कोटी रुपये बनावट कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  बँकेच्या निर्देशावरून वसुली अधिकारी नाना जळगावकर यांनी सोमवारी फिर्याद दाखल केली आहे.
जळगावकर हे सोमवारी सकाळी महागाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, तांत्रिक कारणावरून त्यांना मंगळवारी बोलावून घेण्यात आले व सविस्तर तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यामध्ये चिलगव्हाण सोसायटीचे अध्यक्ष आणि  कंत्राटी सचिव या दोघांनाच जबाबदार धरण्यात आले आहे.
चिलगव्हाण  संस्थेमधून सन २०१६-१७  ला १३ लाख ८१ हजार ५०० रुपये नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आले.  सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक एम. आर. चवरे, वसुली अधिकारी एस. पी. भरवाडे, शाखा निरीक्षक अशोक राठोड आणि सचिव एस. पी. नरवाडे यांना अहवालानुसार जबाबदार धरण्यात आले. सन २०१८-१९ ला ३८ लाख ७४ हजार २७० रुपये नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आले. यू. व्ही. जोशी, अविनाश राठोड, एस. पी. भरवाडे, निशिकांत श्रीरामे, कंत्राटी लिपिक बीबीचंद राठोड, प्रमोद भोयर, नरेंद्र कदम आणि सचिव एस. पी. नरवाडे यांना जबाबदार धरण्यात आले. सन २०१९-२० ला २२ लाख ६६ हजार ५०० रुपये नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणात प्रकाश राठोड, निशिकांत श्रीरामे, एस. पी. भरवाडे, बीबीचंद राठोड, नरेंद्र कदम आणि सचिव एस. पी. नरवाडे यांना जबाबदार धरण्यात आले. 
असे असताना दोघांविरुद्ध  तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि चिलगव्हाण सेवा सोसायटी हे एकमेकाविरुद्ध बोट दाखवून हे घोटाळे जाणीवपूर्वक लोंबकळत कसे राहतील,  यासाठीच पाठशिवणीचा खेळ खेळत असल्याने बँकेच्या ठेवीदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा बॅंकेचा कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न  
- १८ ऑक्टोबर २०२१ रोजी तपासणी केलेल्या अहवालानुसार संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित केली असून, हिवरा शाखेला संलग्न असलेल्या इतर सेवा सोसायटीची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या अहवालानुसार चार अधिकारी नुकतेच निलंबित करण्यात आले असून, अहवालात नमूद असलेल्या इतरांना पाठीशी घातले जात असून, केवळ चिलगव्हाण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनाच दोषी धरले जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

९१ लाख रुपयांच्यावर आर्थिक गुन्हा असल्याने तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी यवतमाळ पाठवला आहे.  फिर्यादीमध्ये ऑडिट रिपोर्ट नाही, त्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सविस्तर फिर्याद दाखल करणे अपेक्षित होते. घटना एकच असून, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि चिलगव्हाण सोसायटीचे सचिव यांनी दोन वेगवेगळ्या फिर्याद दाखल केलेल्या आहे. अजून गुन्हा दाखल झालेला नाही.
- विलास चव्हाण, पोलीस निरीक्षक महागाव पोलीस स्टेशन

 

Web Title: Two complaints of the same incident from the District Central Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक