यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७४ जण नव्याने पॉझेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:50 PM2020-08-13T20:50:57+5:302020-08-13T20:51:25+5:30
यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या ५३ झाली आहे. तर २४ तासात नव्याने ७४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या ५३ झाली आहे. तर २४ तासात नव्याने ७४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले ६६ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील दलित सोसायटी येथील ६१ वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील शिवाजी नगर येथील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ७४ जणांमध्ये ४६ पुरुष आणि २८ महिला आहेत. यात वणी शहरातील दोन पुरुष व चार महिला, यवतमाळ शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथील एक पुरुष, मोठे वडगाव येथील एक पुरुष, बगमारे ले आऊट पिंपळगाव येथील एक पुरुष, कारागृहातील एक पुरुष, सेवा नगर येथील एक महिला, जामनकर नगर येथील एक पुरुष, पिंपळगाव येथील एक महिला, शनी मंदीर चौक येथील एक पुरुष, वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एक महिला, इंदिरा नगर येथील एक पुरुष, वाघापूर नाका येथील एक पुरुष, दिग्रस शहरातील दिनाबाई शाळेमागील एक पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष, शिवाजी चौक येथील एक महिला, रमाई नगर येथील एक पुरुष, बुटले कॉलेज येथील एक महिला, शंकर नगर येथील दोन पुरुष, गवळीपुरा येथील एक महिला, दिग्रस तालुक्यातील सावंगा येथील एक पुरुष व डेहणी येथील एक पुरुष, उमरखेड शहरातील हनुमान वॉर्ड येथील एक महिला, उमरखेड शहरातील १० पुरुष व तीन महिला, उमरखेड तालुक्यातील कोपरा येथील तीन महिला, घाटंजी तालुक्यातील कु-हा येथील एक महिला, जरूर येथील दोन पुरुष व कुर्ली येथील एक महिला, घाटंजी शहरातील नेहरू नगर येथील एक महिला, नेर शहरातील नेताजी चौक येथील दोन पुरुष, नेर तालुक्यातील कानपूर येथील एक पुरुष, आर्णि शहरातील मुबारक नगर येथील तीन पुरुष, पुसद शहरातील सात पुरुष व सात महिला, महागाव शहरातील कलिबी येथील एक पुरुष, महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील एक पुरुष व शिरपूर येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ६६ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ?क्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ६३० आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. यापैकी १३४७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५३ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५२ जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३२८३९ नमुने पाठविले आहे. यापैकी ३२२२२ प्राप्त तर ६१७ अप्राप्त आहेत. तसेच ३०१९० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.