वणी-यवतमाळ मार्गावर अपघातात दोन ठार, सात गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 01:42 PM2018-02-18T13:42:36+5:302018-02-18T13:44:08+5:30
मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.
वणी (यवतमाळ) : मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात वणी-यवतमाळ मार्गावरील बोटोणी गावाजवळ शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडला.
जितेंद्र रामदयाल सिडाणा (40) आणि किरणताई मोहन सिडाणा (37) रा. मारेगाव अशी मृतांची नावे आहे. तर श्रीराम दयाराम सिडाणा (45), दिव्या जितेंद्र सिडाणा (37), नितू श्रीराम सिडाणा (42), इंदर दीपक चन्ना (28), रश्मी इंदर चन्ना (25), कान्हा श्रीराम सिडाणा (5), लाडो जितेंद्र सिडाणा (9) सर्व रा. मारेगाव अशी जखमींची नावे आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मारेगाव येथील सिडाणा परिवार करंजी येथील मुलीकडे माता का जगराता कार्यक्रमासाठी शनिवारी दोन कारने जात होते. त्यावेळी वणी- यवतमाळ मार्गावरील बोटोणी ते जळका दरम्यान समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने एका कारला धडक दिली. त्याच वेळी पाठीमागे असलेली दुसरी कारही या अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात पहिल्या कारमधील जितेंद्र आणि किरणताई ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताने मारेगाववर शोककळा पसरली आहे.