अवनीच्या खात्म्यानंतर झाले दोन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:18 PM2018-11-20T22:18:37+5:302018-11-20T22:19:13+5:30

नरभक्षक वाघिण अवनीच्या खात्म्यानंतर तालुक्यात या मोहीमेशी संबंधित दोन जणांचे दोन सत्कार दोन ठिकाणी झाले. त्यातील एक सत्कार गाजला, तर दुसरा केवळ औपचारिकता ठरला.

Two felices after Avani's death | अवनीच्या खात्म्यानंतर झाले दोन सत्कार

अवनीच्या खात्म्यानंतर झाले दोन सत्कार

Next
ठळक मुद्देराळेगाव तालुक्यातील एक सत्कार गाजला : दुसरा मात्र केवळ औपचारिकच ठरला

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : नरभक्षक वाघिण अवनीच्या खात्म्यानंतर तालुक्यात या मोहीमेशी संबंधित दोन जणांचे दोन सत्कार दोन ठिकाणी झाले. त्यातील एक सत्कार गाजला, तर दुसरा केवळ औपचारिकता ठरला.
सावरखेड येथे शार्प शुटर शफाकत अली व त्याचा मुलगा असगर अली यांचा गावकरी व तालुका काँग्रेस कमेटीने सत्कार केला. तत्पूर्वीच बोराटी येथे वन्यप्राणीग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या सभेत पालकमंत्री मदन येरावार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी उपवनसंरक्षक के.अभर्णा यांचा सत्कार केला. मात्र हा सत्कार केवळ औपचारिकताच ठरला.
वनविभागाच्या निमंत्रणावरून शफाकत अली व त्याचा पुत्र असगर अली याने अवणीला टिपले. नंतर झालेल्या घडामोडीत प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या चौकशीला सामोरे गेलेल्या पिता-पुत्रांचा सावरखेड येथे रात्री सत्कार झाला. काँग्रेसच्या एका पदाधिकाºयाच्या गावात झालेला हा सत्कर अनेक अर्थाने गाजला. दुसरीकडे काँग्रेसचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते अवनीच्या खातम्यामुळे सरकार विरोधी भूमिका घेत होते.
शफाकत अली व असगर अली हे पिता-पुत्र व्यावसायिक शुटर असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यांचे महात्म्य सत्कारातून वाढविण्यात आल्याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील दोन अडीच वर्षांपासून उपवनसंरक्षक के.अभर्णा यांनी वेळोवेळी या भागातील स्थिती सांभाळली.
अनेकदा कटू प्रसंगांचा, लोकांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला.
१० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘टी-१’ शोध मोहिमेच्या मॉनिटरींग चिफ म्हणून अगदी अखेरपर्यंत त्यांनी धिरोदात्तपणे प्रत्येक पावलावर नेतृत्व केले. संपूर्ण परिसरावर वॉच ठेवून वरिष्ठ, कनिष्ठ यात सुयोग्य समन्वय साधला. वाघ पिडीत गावातील नागरिकांतही विश्वास राखण्याची कामगिरी बजावली.
बोराटीची नवीन ओळख
आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी बोराटी हे २७५ लोकसंख्या असलेले गाव दोन वर्षांपूर्वी दत्तक घेतले. ते आता अवनी वाघिणीच्या खातम्याने वेगळ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आले.

Web Title: Two felices after Avani's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.