तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, सहा जखमी
By admin | Published: March 15, 2017 12:30 AM2017-03-15T00:30:23+5:302017-03-15T00:30:23+5:30
धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी झालेल्या अपघातात....
वर्धा : धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी झालेल्या अपघातात तीघे गंभीर जखमी झाले. सावंगी (मेघे), खरांगणा व सेलू पोलीस ठाण्यांतर्गत हे अपघात घडले.
दुचाकी अपघातात मामा ठार, भाचा गंभीर
वर्धा : भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात मामा ठार झाला तर भाचा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा-वायगाव मार्गावरील इंझापूर शिवारात घडला. विजय कामनापूरे, असे मृतकाचे तर अमित चंद्रकांत देशपांडे रा. गजानननगर वर्धा, असे जखमीचे नाव आहे.
प्रापत माहितीनुसार, गजानननगर येथील अमित देशपांडे व विजय कामनापूरे हे दोघे एमएच ४० टी ४०६० क्रमांकाच्या दुचाकीने वायगावकडून वर्धेकडे येत होते. दरम्यान, इंझापूर गावाजवळ दुचाकीला समोरून येणाऱ्या एमएच ३२ एए ६४३२ क्रमांकाच्या दुचाकीने जबर धडक दिली. यात विजय कामनापूरे यांचा जागीच मृत्यू झाला तर अमित देशपांडे गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. याबाबतच्या तक्रारीवरून सावंगी (मेघे) पोलिसांनी आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)