नांदगवान घाटामध्ये विचित्र अपघातामध्ये दोन ठार; महागाव ते उमरखेड वाहतूक ठप्प
By सुरेंद्र राऊत | Updated: April 1, 2024 23:22 IST2024-04-01T23:22:19+5:302024-04-01T23:22:30+5:30
वोल्वो ट्रकच्या खाली दोन जणांचा दाबून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली

नांदगवान घाटामध्ये विचित्र अपघातामध्ये दोन ठार; महागाव ते उमरखेड वाहतूक ठप्प
महागाव(यवतमाळ ) : उमरखेड ते महागाव दरम्यान असलेल्या नांदगव्हाण घाटामध्ये वोल्वो ट्रकला झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. जखमीला नांदेड येथे पोहोचवण्यात आले आहे.
अपघात रात्री दहा वाजताच्या दरम्यान झाला आहे. उमरखेड वरून महागाव करिता येणारी वाहतूक छोट्या वाहनासाठी साडेदहा वाजता सुरू करण्यात आली. महागाव ते उमरखेड जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. वोल्वो ट्रकच्या खाली दोन जणांचा दाबून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. मृतकाची अद्यापही ओळख पटलेली नाही. महागाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.