भरधाव ट्रेलरने दोघांना चिरडले; राळेगाव येथील घटना

By विलास गावंडे | Published: March 13, 2023 05:01 PM2023-03-13T17:01:36+5:302023-03-13T17:03:24+5:30

नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी 

two labour crushed by the speeding trailer at ralgaon | भरधाव ट्रेलरने दोघांना चिरडले; राळेगाव येथील घटना

भरधाव ट्रेलरने दोघांना चिरडले; राळेगाव येथील घटना

googlenewsNext

राळेगाव (यवतमाळ) : रस्त्यावर पडलेली ट्रॅक्टरची पंजी उचलत असताना दोन युवकांंना ट्रेलरने चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येथील वर्धा बायपासवर घडली. करण पंडित मेश्राम (१८), मनोज महादेव जुमनाके (२२) रा. निधा ता. राळेगाव अशी मृतांची नावे आहेत.

उन्हाळवाही करण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टरवर करण व मनोज हे दोघे मजूर होते. राळेगाव वर्धा बायपासवर या ट्रॅक्टरची पंजी पडली. ती उचलण्यासाठी हे दाेघेही खाली उतरले. त्याच वेळी काळ बनून आलेल्या १६ चाकाच्या भरधाव ट्रेलरने (एमएच-३२-क्यू-५९३२) या दोघांनाही चिरडले. घटनेची माहिती होताच नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

Web Title: two labour crushed by the speeding trailer at ralgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.