मुडाणा येथे दोन लाखांची लोकवर्गणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:43+5:302021-07-08T04:27:43+5:30
मुडाणा : महागाव तालुक्यातील मुडाणा येथे गावकऱ्यांनी एकत्रित येत, तब्बल दाेन लाख ११ हजारांची लोकवर्गणी गोळा केली. यातून आता ...
मुडाणा : महागाव तालुक्यातील मुडाणा येथे गावकऱ्यांनी एकत्रित येत, तब्बल दाेन लाख ११ हजारांची लोकवर्गणी गोळा केली. यातून आता स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण केले जात आहे.
हभप तानाजी बोरकर महाराज यांच्या कल्पनेतून मुडाणा येथे स्मशानभूमी सौंदर्यीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवर्य तानाजी महाराज बोरकर यांच्या मार्गदर्शनात स्मशानभूमीमध्ये महादेवाची मूर्ती स्थापन करण्यासाठी गावातील लोकांना विश्वासात घेतले, नंतर लोकसहभागातून देणगी गोळा करण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता तब्बल दोन लाख ११ हजार रुपये जमा झाले.
बुधवारी जय हरी मित्रपरिवार व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत स्मशानभूमीमध्ये महादेवाची मूर्ती बसविण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हभप तानाजी महाराज बोरकर, महागावचे तहसीलदार नामदेव इसळकर, निजधाम संस्थेचे अध्यक्ष भाऊ वानखेडे, उपसभापती रामभाऊ तंबाखे, तलाठी भाऊ इंगोले, पोलीस पाटील दिलीप खराटे, सरपंच वैभव बरडे, सदानंद पाटील, गजानन पाटील, नंदकुमार येनकर, बाजीराव खंदारे, प्रकाश उंचेगावकर, अशोक वानखेडे, आत्माराव माटाळकर, ब्रह्मानंद दारव्हेकर, दत्तराव येनकर, मयूर काळे, बाळासाहेब येनकर, ज्ञानेश्वर पानपट्टे, अनिल डाहाळे, आकाश पानपट्टे, बाळासाहेब जाधव, अनिल पुरी, तानाजी कदम, गजानन वानखेडे, विशाल पंडागळे, शंकर जाधव, आकाश किवले, सुरेश किवले, सचिन वानखेडे, बंडू महाराज गिरी व गावकरी उपस्थित होते. यावेळी स्मशानभूमीत वृक्षलागवड करण्यात आली. हभप तानाजी महाराज यांनी तरुणपिढीने आपला वाढदिवस एक झाड लावून साजरा करावा, असे आवाहन केले.