Corona Virus; यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडात दोन परिसर हॉटस्पॉट घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:51 PM2020-06-10T21:51:39+5:302020-06-10T21:52:00+5:30
पांढरकवडातील एक व्यक्ती मुंबईत कोरोना पॉझीटीव्ह झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी आखाडा वॉर्ड व तालुक्यातील करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा एकही रूग्ण नसताना प्रशासनाने पांढरकवडातील आखाडा वॉर्ड व करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत.
पांढरकवडातील एक व्यक्ती मुंबईत कोरोना पॉझीटीव्ह झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी आखाडा वॉर्ड व तालुक्यातील करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. या दोनही परिसरात वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन आरोग्यविषयक तपासणी करणार आहे. यासंदर्भात सुरेश कव्हळे यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्याने हे दोन परिसरत हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.