एकाच दिवशी लागणार दोन कोटी वृक्ष

By Admin | Published: May 24, 2016 12:04 AM2016-05-24T00:04:45+5:302016-05-24T00:04:45+5:30

वृक्षारोपणाचा विक्रम करण्यासाठी महसूल आणि वनविभाग पुढे सरसावला आहे. १ जुलै या एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

Two million trees will be required in one day | एकाच दिवशी लागणार दोन कोटी वृक्ष

एकाच दिवशी लागणार दोन कोटी वृक्ष

googlenewsNext

नोेडल अधिकारी : ‘जीपीआरएस’च्या माध्यमातून होणार तपासणी
यवतमाळ : वृक्षारोपणाचा विक्रम करण्यासाठी महसूल आणि वनविभाग पुढे सरसावला आहे. १ जुलै या एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या लागवडीचे वास्तव जाणण्यासाठी जीपीआरएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुुक्ती करण्यात आली आहे. त्या दृष्टीने वन आणि सहकार विभागाने नियोजन केले आहे.
वन विकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभागाच्या नेतृत्वात महसूल विभागाने नियोजन तयार केले आहे. १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे आदेश महसूल आणि वन विभागाचे सहसचिव डी.एल. थोरात यांनी दिले आहेत.
वन विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग दीड कोटी वृक्षांची लागवड करणार आहेत. तर ५० लक्ष वृक्षांची लागवड विविध शासकीय विभाग आणि खासगी संस्था, व्यक्ती यांच्या मार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड पंधरवाडा राबविला जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी जागेची पाहणी करणे आणि वृक्षांचे संर्वधन करण्याची जबाबदारी प्रत्येक कर्मचारी, संस्था अथवा नागरिकांवर दिली जाणार आहे. त्या दृष्टीने महसूल यंत्रणा कामी लागली आहे. या योजनेत सहकार विभाग आणि विविध सहकारी संस्था जिल्ह्यात दीड लक्ष वृक्षांची लागवड करणार आहे. (शहर वार्ताहर)

यवतमाळ ग्रिन सिटी होणार
भविष्यात यवतमाळची ओळख ग्रिन सिटी म्हणून निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. जिल्हा मुुख्यालयात एक हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन सहकार विभागाने केले आहे. रस्त्याच्या दुुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

Web Title: Two million trees will be required in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.