यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार शरद पवारांसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:04 IST2019-11-23T15:38:34+5:302019-11-23T16:04:47+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही आमदार अनुक्रमे इंद्रनील नाईक व ख्वाजा बेग या दोघांनीही आपण पक्ष आणि नेते शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार शरद पवारांसोबत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार अनुक्रमे इंद्रनील नाईक व ख्वाजा बेग या दोघांनीही आपण पक्ष आणि नेते शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे लोकमतला सांगितले. शनिवारी सकाळी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा ज्या पद्धतीने घेतला गेला ते चुकीचेच झाल्याची प्रतिक्रिया आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली.
विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनीसुद्धा आपण कायम शरद पवारांसोबत राहणार असल्याचे सांगितले.