लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 10:30 AM2022-02-08T10:30:00+5:302022-02-08T10:30:03+5:30

रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले.

two old friends who were fans of Lata mangeshkar died one after the other | लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण

लतादीदींच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी एकापाठोपाठ सोडले प्राण

Next
ठळक मुद्देगानसम्राज्ञीच्या निस्सीम भक्तरेडिओच्या काळापासून होती गीतांची आवड

शेषराव राठोड

कन्हेरवाडी (यवतमाळ) : भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी दूरचित्रवाणीवर झळकत होती. ही बातमी पाहताच, पुसद तालुक्यातील माळपठारावरील म्हैसमाळ येथील दोन मैत्रिणींनीही आपले प्राण सोडले. त्या दोघीही लहानपणापासून लतादीदींच्या फॅन होत्या.

चंद्रभागाबाई बळीराम बेद्रे (८३) आणि सुंदलबाई हरिभाऊ राठोड (८२) अशी या दोन जीवलग मैत्रिणींची नावे आहेत. या दोघींचीही घरे म्हैसमाळ येथे समोरासमोर आहेत. लहानपणापासून दोघीही लतादीदींच्या निस्सीम भक्त होत्या. दोघीही रेडिओवर लतादीदींचे गाणे ऐकायच्या. ‘ऐ मेरे वतन के लोगो’पासून ‘आता विसाव्याचे क्षण’ या गीतापर्यंत त्यांना लतादीदींची सर्वच गाणी आवडत होती. ऐंशीच्या दशकात टीव्ही आल्यानंतर त्यांनी टीव्हीवरही लतादीदींच्या आवाजातील अनेक गाणी पाहिली आणि ऐकली.

चंद्रभागाबाई आणि सुंदलबाई यांची घरे समोरासमोर होते. रोजच लतादीदींचे कोणते ना कोणते गाणे दोघी मिळून ऐकायचे हा त्यांचा नित्यक्रम होता. रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे म्हैसमाळ येथे शोककळा पसरली. चंद्रभागाबाई बेद्रे यांच्या मागे प्रकाश, सुखदेव, सुरेश ही मुले व शुभद्राबाई ही विवाहित मुलगी आहे. सुंदलबाई यांच्या मागे बाबूसिंग, जयवंत, वसंतराव, पुरणसिंग, अंबादास ही मुले तर लीलाबाई, शीला, रेणुका या तीन मुली आहेत.

दीड तासाच्या अंतराने निधन

चंद्रभागाबाई बेद्रे आणि सुंदलबाई राठोड यांची गेल्या ५० वर्षांपासून मैत्री होती. लतादीदींच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर, रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रथम चंद्रभागाबाई यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लतादीदींच्या विरहातच त्यांनी प्राण सोडले. लतादीदी आणि चंद्रभागाबाईंच्या निधनाचे दु:ख अनावर होऊन सुंदलबाई यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांनीही रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास या जगाचा निरोप घेतला.

Web Title: two old friends who were fans of Lata mangeshkar died one after the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.