राळेगावात आग लागून दोन दुकाने जळून खाक; दिवाळीच्या दिवशीची घटना
By विलास गावंडे | Published: October 25, 2022 11:01 AM2022-10-25T11:01:01+5:302022-10-25T11:01:28+5:30
काळे इन्शुरन्स मध्ये प्रथम आग लागली हे लक्षात येऊनही कोणतीही सुविधा नसल्याने आगेवर नियंत्रण मिळवता आले नाही.
राळेगाव (यवतमाळ) : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना लक्ष्मीची पूजा सुरू असताना रात्री नऊ वाजता क्रांती चौकातील काळे इन्शुरन्स सर्विस व शिव किराणा दुकान हे दोन दुकाने जळून खाक झाली आग कशाने लागली याचे नेमके कारण करू शकले नाही. ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला शिव किराणा दुकानचे संचालक संदीप वाघ हे दुकानांमध्येच होते. बाजूच्या काळे इन्शुरन्स मध्ये प्रथम आग लागली हे लक्षात येऊनही कोणतीही सुविधा नसल्याने आगेवर नियंत्रण मिळवता आले नाही.
काळे इन्शुरन्स सर्विस मधून बाजूला असलेल्या शिव किराणा दुकानात आग शिरली. संदीप वाघ यांनी कसेबसे काऊंटर मधील पैसे व चार तेलाचे पिपे बाहेर काढले. डोळ्यादेखत आगीने भडका घेतला. यात संपूर्ण किराणामाल व काळे इन्शुरन्स सर्विसमधील महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर, एसी सर्व क्षणात जळून खाक झाले.
नागरिकांची एकच धावपळ
आपली पूजा सोडून परिसरातील सर्व नागरिक ठिकाणी पोहोचले मिळेल त्या साधनांनी आगेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला राळेगाव येथे अग्निशामक नियंत्रणाची कोणतीही साधने नसल्याने यवतमाळ व घटांची वरून अग्निशामक बंब बनवण्यात आले तब्बल चार तासांनी आगेवर नियंत्रण आले यात शिव किराणा दुकानातील जवळपास२० लाखाचे नुकसान झाले तर काळे इन्शुरन्स सर्विस चे 15 लाखाचे वर नुकसान झाल्याचे सांगितले घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पाटील ठाणेदार संजय चौबे यांनी धाव घेऊन घटनेची माहिती प्रशासनाला दिली.
राळेगाव येथे अग्निशामक वाहनांची गरज
राळेगाव शहरात आसपास 14 जिनिंग आहे मोठे उद्योग इथे आहे परंतु नगरपंचायत व प्रशासनाकडे अग्निशामक वाहनाची व्यवस्था नसल्याने आगीसारखे प्रसंग घडल्यास यवतमाळ वणी हिंगणघाट वर्धा अशा ठिकाणावरून यंत्रणेला बोलवावे लागते अग्निशामक यंत्रणेची व्यवस्था करावी अशी जनतेची मागणी आहे